श्यामची आई
मागच्या शनिवारी चित्रपट पाहिला . साधारणतः चित्रपट पाहिल्याच्या २-३ दिवसात मी परीक्षण टाकतो ( टंकायची इच्छा असली तर ) पण यावेळेस एक आठवडा गेला. असो . ( वर्ल्ड कप हरल्याचा धक्का आणखी काय)
श्यामची आई नावात वजन असले तरी मापात नाही. ह्या एका वाक्यात परीक्षण संपवू शकलो असतो पण वादंग टाळण्यासाठी पुढील ओळी खरडतोय.
संपूर्ण चित्रपट कृष्ण धवल रंगात आहे परंतु पहिल्या कृष्ण धवल चित्रपटाची सर नाही."श्यामची आई " हे पुस्तक संस्कारक्षम वयात वाचावयास दिले जाते आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा त्याच याच अपेक्षेने चित्रपट पाहावयास जाणार असतील तर हाती निराशा लागेल.
मिसळपाव