Skip to main content

विचार

बंड्याची दिवाळी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 29/10/2011 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही.

महेश लंच होम..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 28/10/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या. एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं. आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम हाय-फाय.

ए रोझ फॉर ए रोझ

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 28/10/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबांचा गुलाब. गुलाबांचा डॉल्फीन.

थँक गॉड इट्स् फ्रायडे..बट नो थँक्स..

लेखक गवि यांनी सोमवार, 24/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
"बेतार योजना और समन्वय स्कंध" असा बोर्ड असलेल्या हपीसात बरोब्बर चौदा वर्षांपूर्वी मी एरॉनॉटिकल रेडिओ लायसेन्सच्या परीक्षेला गेलो होतो. त्यावेळी पाचदहा टक्के पासिंग रेट असलेली ही परीक्षा.. पण तरीही त्यावेळी माझ्यासोबत असलेले सर्व शिकाऊ पायलट मित्र दिल्लीत पोचण्यापूर्वीपासूनच परीक्षेपेक्षा जास्त तीव्रतेने वाट पहात होते ती परीक्षेनंतर त्याच संध्याकाळी ठरलेल्या टीजीआय फ्रायडेमधल्या पार्टीची. मी त्यावेळी "घेत" नसल्याने, शिव शिव करुन त्या सर्वांना वसंतविहारमधे "ड्रॉप" केलं आणि तीच गाडी दिल्लीभर फिरवून तीन तासांनी परत त्यांना पिकअप करायला आलो. तेव्हा मोबाईल वगैरे काही सर्वांकडे नसायचे.

डॉक्टर 'क्ष'

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 24/10/2011 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रत्येकजण आयुष्यात उतारचढ, आनंद, दु:ख आपापल्या परीने अनुभवत असतो. पण काही उतारचढ असे असतात की माणसाचा कस लागतो, सत्वपरीक्षा घेतो काळ. असे अनुभव न यावेत तेच बरे. नाहीतर सामान्य विचारसरणीचा माणूस गवताच्या वाळलेल्या पात्याप्रमाणे हरवून जातो त्या वादळात. ही कहाणी आहे डॉक्टर 'क्ष' यांची. माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत हेच माझे फॅमिली डॉक्टर. सत्तरच्या दशकात डॉक्टरांनी 'प्रॅक्टीस' सुरु केली. त्यावेळी डॉक्टर म्हणजे फारच प्रतिष्ठित आणु दुर्मीळ कौशल्य असलेले व्यक्ती. डॉक्टरांचा जम बसला, पुण्यात त्यांची प्रॅक्टीस चांगली सुरु झाली.

फिशरमन्स व्हार्फ..

लेखक गवि यांनी गुरुवार, 20/10/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याला फेरी ही माझ्या जिवाभावाची गोष्ट आहे. यंदाच्या फेरीत मी माझ्या आवडत्या कोळवा बीचवरच मुक्काम ठोकला. कोळवा बीचवर केंच्युकी हे खाण्याचं जबरदस्त ठिकाण आहे. त्याहूनही भारी असलेलं "मार्टिन्स कॉर्नर" तिथून थोड्याश्याच अंतरावर आहे. या ठिकाणांविषयी परत कधीतरी लिहीन कदाचित. पण यंदा असंच फिरत फिरत सापडलेलं ठिकाण म्हणजे "फिशरमन्स व्हार्फ" सर्वांसमोर आणावं म्हणून लिहावंसं वाटलं.. खादाडी सफरीमधे.. अशा खात्रीने की मिपावर अनेक खाद्यसंप्रदायी आहेत, आणि वेगवेगळ्या टाईपची खादाडीची ठिकाणं माहीत झालेली त्यांना आवडतील यावेळी काहीतरी वेगळं हवं होतं.