मी आणि कानयंत्र..
अखेर मी म्हातारी झाले. वय चोरुन बघितलं पण शरीर ऐकेना. अनेक वस्तू मला ॲक्सेसरीज् म्हणून गरजेच्या वाटू लागल्या. मला ऐकू येईनासं झालं. घरातला टीव्ही मी खूप मोठ्या आवाजात लावून बसू लागले. त्या आवाजाचा घरच्यांना त्रास होऊ लागला. गेले दीड वर्ष मुलाचं वर्क फ्रॉम होम होतं आणि नातवाची ऑनलाईन शाळा होती. मी आणि सूनबाई तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसायचो. टीव्ही वरील कोरोनाच्या आणि हे सरकार कोसळणार की पाच वर्षे टिकणार, याबद्दलच्या बातम्या कितीदा ऐकायच्या? मग मी टीव्हीवर मनोरंजक कार्यक्रम बघायची. मला ऐकू येत नाही म्हणून आवाज मोठा करायची. संवादच ऐकू आले नाहीत तर सिरीयल ची मजा ती काय हो?
मिसळपाव