Skip to main content

विचार

राजमाचीच्या आठवणी-माझ्याही

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 24/08/2020 13:06 या दिवशी प्रकाशित केले.

खूप वर्ष झाली असतील, राजमाचीचा पहिला ट्रेक कधी केला ते आता नेमकं आठवत नाही. किंबहुना पहिल्यांदाच राजमाचीच्या त्या नितांतसुंदर वाटेवर जाऊनही तेव्हा माचीला न जाता सरळ पुढे गेलो होतो ते म्हणजे ढाकच्या बहिरीला.

वसूली

लेखक Govind यांनी सोमवार, 24/08/2020 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
निवरादादा आता खूपच थकला आहे पण आजदेखील तो शिलाई मशिनवर बसून कपडे शिवत असतो. तीनही मुलींची लग्नं झाली आणि त्यांना मुलंबाळंदेखील झाली. आता कसली म्हणून चिंता उरली नाही. एक दीड एकर जमिनीचा तुकडा आहे तिथं त्याची बायको शेतीची कामं करते आणि निवृत्ती उर्फ निवरादादा आपला अपंग पाय घेऊन लोकांचे कपडे शिवत बसतो. मला बघताच त्यानं हाक मारली आणि मी त्याच्याकडं गेलो. गावातील बर्‍याच लोकांच्या आतल्या गोष्टी याला ठाऊक. त्याच्यासोबत गप्पा मारत बसणं हा एक विलक्षण विरंगुळा असे. खूप सार्‍या गोष्टी त्याच्याकडून कानावर येत. त्याच्या जवानीतल्या कित्येक गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या आहेत.

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/08/2020 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 24/08/2020 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
**************** सकाळचा तो लोकल ट्रेनच्या आतला भाग. नाकीनऊ करत का होईना ट्रेनच्या आतल्या गर्दीत एकदाचे दोन्ही पाय डब्यात टेकवायला जागा झाली खरी, आणि थोडं थोडं पुढे आतमध्ये शिरत, आता एका कोप-यात टेकून उभं राहता आलं शेवटी त्याला, माणसां मागून माणसं आत रेटत होती, मघास पासून आत खिश्यात असलेला मोबाईल एकदाचा हातात आला, आजूबाजूला एकदा त्यानें सभोवार नजर मारली, खूपजण त्यांच्यासारखेच मोबाईलमध्ये गुंतले होते, तितक्यात अचानक एकजण उठल्यामुळे बसण्याजोगी ‘चौथ्या’ सीटची जागा झाली आणि तो बसला.

पार्टी

लेखक Govind यांनी रविवार, 23/08/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सुगी संपली आणि ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. सालाबादप्रमाणे गावोगावचे मजूर ऊसतोडीसाठी निघाले. आमच्या गावातील काहीजण दूरदूरपर्यंत जायचे.त्यांच्या नेण्याआणण्याची आणि रोजंदारीची व्यवस्था शेजारच्या गावातील काही जण करायचे. त्यांना मुकादम म्हणतात. आठ दहा टोळ्या त्यांच्या हाताखाली असतात. कामगारांची ने आण करायला तेव्हा ट्रक नव्हते. या टोळ्या रबरी टायरची चाके लावलेल्या बैलगाड्यांमधून उसाची वाहतूक करीत. अशा टोळ्या आमच्या गावावरून निघाल्या कि त्यांची ती भलीमोठी रांग पाहायला भारी मजा यायची. बैलांच्या गळ्यातील घुंघरमाळांची ती कलकल ऐकून कितीतरी वेळा भान हरपून जाई. आजही तिचा आवाज माझ्या कानांमधे घुमतो.

वाढदिवस आणि समाज माध्यमे

लेखक मृगतृष्णा यांनी रविवार, 23/08/2020 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी " लेखा" चा वाढदिवस होता , दिवस नेहमीप्रमाणेच उजाडला, पहाटे ५.३० वाजता लेखा उठली , मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा , सासु-सासाऱ्यांच्या चहा ची तयारी , दूध तापविणे, नाश्त्याला कोण काय खाणार असे सगळे नेहमीचेच विचार डोक्यात सुरू होते . स्वतः चे आटोपून लेखाने चहा चा कप हातात घेतला आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला , आई चा फोन होता , " लेखा बाळा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुला उदंड आयुष्य लाभो, तुला पुढच्या आयुष्यातही असेच आनंद आणि सौख्य लाभो , सुखी राहा बाळा. " आई म्हणाली . लेखाच्या डोळ्यात टचकन पाणी आले .

अव्यक्त स्पंदने

लेखक तेजल दळवी यांनी बुधवार, 19/08/2020 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात.. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही.. मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते.. कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात..

“WHO ला काय कळतं?"

लेखक आगाऊ म्हादया यांनी बुधवार, 19/08/2020 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका राजकीय मुखपत्राचे संपादक काहीतरी बोलले आणि त्यावरूनच बरेच विनोद, मिम्स असल्या गोष्टीचं सत्र सुरु झालं. पण त्यांच्या बोलण्याचं मूळ सुद्धा आपल्यात अजाणतेपणी रुजलेल्या समजुतीत आहे असं मला वाटतं. ते म्हणजे “डॉक्टरला काय कळतं?” ह्याचं एक्स्टेन्शन “WHO ला काय कळतं? का म्हणे? डॉक्टरला काही कळत नाही तर २ दिवस अंगावर दुखणं काढून झालं की रात्री अपरात्री डाक्टर का आठवतो मग? ते राहू दे, त्याबद्दल पुन्हा केव्हातरी बोलू. पण गेल्या काही महिन्यात जेव्हा जगावर हे महासंकट आलं तेव्हा WHO मध्ये बसलेल्या त्या तज्ज्ञ लोकांवर किती दबाव असेल, जबाबदारीचं ओझं किती असेल ह्याचा विचार केलाय कुणी?

गणेशोत्सव, गणपती बसवायचा मुहूर्त ,किती दिवस बसवावा गणपती?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 19/08/2020 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.

अंतहीन

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 17/08/2020 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं सुरू झालं ते मिथिला पालकरच्या इंस्टा रील पासून काल रात्री बाहेर पाऊस बरसत असतांना, इन्स्टाग्रामवर तिने sing song saturday मध्ये 'जाओ पाखी' गाण्याच्या काही ओळी गुणगुणल्या होत्या. बाहेर पाऊस आणि तिचा गोड बासुंदी आवाजात म्हणलेल्या त्या दोनच ओळी खूप आवडून गेल्या.