विचार
'छंदामागचं त्रिकूट'
आपल्या बाबतीत एखाद्या गोष्टीचं छंदात किंवा मराठीत ज्याला पॅशन म्हणतात त्यात रुपांतर कधी होतं?
जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे उदा.चित्रकला असो किंवा गायन,वादन,लेखन,वस्तूंची निर्मिती,दुरुस्ती,विक्रीकला कोणतंही क्षेत्र असो, त्यातून स्वत:ला आनंद तर मिळायला हवाच पण लोकांकडूनही कौतुक व्हायला हवं तरच ती कला,तो छंद अजून बहरतो.त्या छंदातलं अजून जितकं काही शिकता येईल तितकं शिकण्याचा हुरुप वाढतो.हा हुरुप वाढवण्याचं काम लोक करत असतात.त्यांच्यामुळेच तर कळतं की आपण सामान्यापेक्षा थोडेसे का होईना वरचढ आहोत.ही 'थोडसं वरचढ' असण्याची भावनाच सुरुवातीच्या प्रेरणेचं काम करत असते.त्या प्रेरणेच्या जोरावरच आपण अज
निरोप
भावनेची आर्तता भरभरून मांडणारा, सुटलेपणाची, तुटलेपणाची बोचणी देणारा- क्षणापूर्वी आपला असणारा आणि पुन्हा कधी अनुभवता येईल की नाही अशा साशंक वळणावरचा हा क्षण! कुणीतरी देण्यापूर्वी तो घेता यायला हवा असा हा अलौकिक क्षण- निरोप
कधी अल्लड वयात घरभर नाचणारी सर्वांना आपलंसं करुन घेणारी लाडकी लेक मायेचा उंबरठा ओलांडून जेव्हा दूरदेशी वेशीपल्याड निघते तेव्हा आई बाबांच्या कापऱ्या हातांना अगदी घट्ट धरून हुंदके देत देत पोरसवदा भावनेने इच्छा नसताना एक निरोप घेते. तिला तो घ्यायचा नसतो आणि मायेच्या माणसांनाही तिला तो द्यायचा नसतो पण हा निरोप ठरलेला असतो.
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
योग- सायकल प्रव
एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद
५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
योग- सायकल यात्रेचा चौथा दिवस, १४ मेची पहाट. आज अंबडवरून औरंगाबादला जायचं आहे.
(येकदम) स्मार्ट पुणे
कथा आहे सध्या पुण्यांत चालू असलेल्या " Smart City" मोहिमेच्या एका भागाची - शितावरून भाताची परीक्षा होईलच!
पुणे (आधीच "स्मार्ट" असले तरी "Smart City" मोहिमेखाली आणखी जास्त) "स्मार्ट" करण्याच्या प्रयत्नातली पहिली/प्रायोगिक पायरी (Pilot Project) म्हणून परिहार चौक, औंध, पुणे याच्या आजूबाजूचा काही भाग/रस्ता "Smart" करणे काही काळ चालू आहे.
रेम्माम्मा रेम्माम्मा रे..
भेंड्या खेळाव्यात. मुळातच हरकत किंवा वैर नाही. छान बैठा खेळ आहे. उगीच पळापळ नको. जरा मधेमधे चारेक टाळ्या वाजवल्या की झालं.
आणि बसने वगैरे दूर दूर जाताना, ऍज अ टुरिस्ट ग्रुप हक्काचं आपलं मराठी माणूस आपल्याला मुंबई ते मुंबई हाकलून हाकलून परत आणताना... किंवा नातेवाईक मिळून टेम्पो ट्रॅव्हलरने तीन दिवसांत अष्टविनायक "करत" असताना .. उपयोगी पडतो वाटेत हा खेळ.
जनरली एक पन्नाशीतले तरुण काका बसमध्ये हे सुरु करतात. त्यांना गायची आवड असते. सगळी गाणी तेच काका म्हणतात. इतरजण पहिला अर्धा तास जोरात आणि मग क्षीण टाळ्या वाजवतात. खर्ज आवाजात पुटपुट करत ओठ गाण्यानुसार हलवतात.
चांगली बातमी
विविध प्रकारच्या वाईट बातमीचा धुराळा उडत असताना नेहमी प्रमाणे आमच्या मीडियाने एक चांगली बातमी लोकां पर्यंत पोचवलीच नाही.
महिंद्रा ह्या भारतीय कंपनीच्या Airvan १० ह्या दहा लोकांना नेऊ शकणाऱ्या विमानाला DGCA आणि इतर वायुवाहन संबधी यंत्रणांनी हिरवा कंदील दाखवला. आता महिंद्रा येत्या सहा महिन्यात भारतात हि विमाने विकू शकेल. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये २०१७ सालीच त्यांना परमिशन मिळाली होती.
इंजिन रोल्स रॉयस चे आहे. अजून पर्यंत विमानासाठी इंजिन बनवणे भारताला शक्य झालेले नाही. विमानाची किंमत सुमारे १० कोटी असेल. पण त्याच्या तुलनेत सेसना इत्यादी विदेशी विमानांची किंमत सुमारे १८ कोटी आहे.
स्वप्न
जागेपणि बघतो ती वेगळी अणि झोपेत बघतो ती वेगळी.
खरच स्वप्नांची दुनिया काही औरच.
जागेपणि जी स्वप्न बघतो ती शक्यतो आपल्या भविष्याला धरून असतात. आणि दिवासभरच्या घडामोडी वर अवलंबून असतात अशी काही झोपेतली स्वप्न जी सन्दर्भ विरहित असतात.
माणूस जन्माला येतो तेहि स्वप्नवतच आहेना. नऊ महीने आपली माता आपणास स्वताच्या गर्भात वाढवते. ती आणि आपले वडील त्या गर्भाला विचारात घेऊन स्वप्न बघतात. मूल झाल्यावर ते अस वगेल तस वगेल. पण तेच मूल मोठ झाल्यावर आपल्या स्वप्नात रंगून जात.आणि आपण आपल्या जन्मदात्यांना काहीतरी देण लागतो हे विसरून जात.
जन्माला आल्यापासूनच जणू परीक्षा चालू होते.
मिसळपाव