Skip to main content

विचार

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 17/11/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते. अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे. रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते. प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो.

काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 15/11/2017 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय. भाग १ - आठवड्याचे सात दिवस. भाग २ - अधिकमास आणि क्षयमास. एक चान्द्रमास (एक अमावास्या ते पुढची अमावास्या) २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे पूर्वी लिहिलेले आहे. म्हणजे चान्द्रमास तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. अमावास्येला चन्द्र आणि सूर्य एकाच रेखांशावर असतात आणि एकाच वेळेस मावळतात.

मैत्रिणीचा नवरा

लेखक आगाऊ म्हादया यांनी रविवार, 12/11/2017 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मैत्रिणीकडे गेलो होतो, तिचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. तीने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली तिच्या भावी नवऱ्याशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडतात बोलताना, की हं, हे झालं; आता काय बोलायचं? त्याला तसले काही प्रश्न पडत नव्हते. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न पडत नाही साधारणपणे. तिच्या वडिलांना भेटलो नंतर. काका एकदम खुश. माझ्या पाठीवर गुद्दा मारत म्हणाले, “मग? कसा वाटला आमचा जावई?” जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती.

शिवकाल-निर्णय

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 10/11/2017 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिवकाल-निर्णय दिनांक १० नोव्हेंबर, २०१७. आज अफ़जलखानाच्या वधाला ३५८ वर्षे पूर्ण झाली. सहज म्हणून 'कालनिर्णय' पाहिलं तर ह्या दिवशी 'कालभैरव जयंती' असल्याचं समजलं. ह्या 'कालभैरव जयंती' खेरीज अफजलखान नावाच्या ‘काळभैरवाची पुण्यतिथी' देखील नमूद करायला हवी होती असं वाटलं. 'कालभैरव जयंती' शिवाय 'पाटीलबुवा गोविंद झावरे पुण्यतिथी' देखील कालनिर्णय मध्ये ह्याच दिवशी लिहिली आहे. गावो-गावच्या लहान-मोठ्या महाराजांच्या जयंती, पुण्यतिथी आणि सणवार इतपत मर्यादित माहिती आपल्या कॅलेंडर्स मध्ये असते.

काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 09/11/2017 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास. भाग १ - आठवड्याचे सात दिवस. अतिप्राचीन कालामध्ये कालगणनेची नैसर्गिकपणे उद्भवलेली पहिली संकल्पना ’दिवस’ असे निश्चितीने म्हणता यावे. एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत लोटणारा काळ म्हणजे एक दिवस. तो प्रत्येक मानवाला सहजच जाणवतो. त्या नंतरची निर्माण झालेली संकल्पना म्हणजे मास किंवा महिना. अमावास्या म्हणजे सूर्य-चंद्र युती किंवा सूर्य आणि चन्द्र ह्यांचे रेखांश (Right Ascension) सारखे असणे. अशा एका अमावास्येपासून त्याच्या पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधि म्हणजे एक चांद्रमास होय.

इंडीयन डिमन डे -३०१६ कहाणी एका सणाची !

लेखक रामदास यांनी बुधवार, 08/11/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
१००० वर्षांनंतर भारतात साजरा होणार्‍या एका सणाचे हे वर्णन आहे." मुलांच्या पुस्तकातला हा धडा अर्थातच इंग्रजीत आहे. मुलांनो, आपण दरवर्षी इंडियन डीमन डे साजरा करतो. खरे म्हणजे हा डीमन डे म्हणजे दैत्याचा दिवस असा गैरसमज तुमच्या मनात झाला असेल तर तो काढून टाका.

आस्तिक-नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा, इ इ इ मानवी संकल्पनांवर होणारे वादविवाद

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/11/2017 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : अठ्ठावीस लक्ष रुपये, त्यात उद्धृत केलेले एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेले एक वाचकाचे पत्र, तत्सम विषयांवरचे इतर लेख व त्यांच्यावरची चर्चा. वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून... (अ) एका लोभी माणसाच्या लालचीचा (कमी वेळात पैसे अनेक पटींनी वाढवणे) फायदा घेऊन दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले किंवा (आ) एका भ्रष्ट माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन, भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती (हवाला मार्गे) कायदेशीर बनवून देतो, असे सांगून दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले असाच जास्त दिसतो.

काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 02/11/2017 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस. आठवड्याच्या सात दिवसांची व्यवस्था आहे तशी का आहे ह्याचा विचार करायला कोणी कधी थांबतो काय? रविवारनंतर सोमवार, त्यानंतर मंगळवार इत्यादि सात दिवसांच्या परंपरेचे रहाटगाडगे आपल्या विचारांचा इतका अविभाज्य भाग झाले आहे की आहे ते तसे का आहे हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे हेहि आपणास सुचत नाही. आठवड्यात दिवस सात का, रविवारनंतर सोमवार यावा, सोमवारनंतर मंगळवार यावा ही व्यवस्था कोणी, कधी आणि कोठे निर्माण केली असे प्रश्न विचार केल्यास निर्माण होतात. ह्या प्रश्नांची उत्तरे, मला माहीत आहेत तशी, देण्याचा प्रयत्न ह्या लेखामध्ये केला आहे.

शिक्षणाचा अधिकार : एक प्रेसेंटेशन

लेखक साहना यांनी शुक्रवार, 27/10/2017 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाचा अधिकार ह्या विषवल्ली विरुद्ध जे माझे काम चालू आहे त्यासाठी मिपा वरील अनेक वाचकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक व्यक्तींनी ह्याविषयावर आणखीन माहिती मागितली होती. ह्या विषयावर काम करणारे RealityCheckIndia आणि प्राणसुत्र ह्या दोघांनी या विषयावर फार चांगले प्रेसेंटेशन बनवले आहे. मिपा वाल्यानी ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा.

फास्टर फेणे च्या निमित्ताने

लेखक ओरायन यांनी बुधवार, 25/10/2017 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपासून टीव्हीवर फाफे च्या प्रमोशनची जहिरात बघत आहे. हे बघतांना मन भुतकाळात जाते. सहावी, सातवीत होतो. तेंव्हा टीव्ही असणारे कुटूंब फार कमी होते. त्यामुळे असेल कदाचित,पण आमचा फावला वेळ मैदानी खेळ व वाचनात जात असे. मला वाचनाची आवड होतीच. त्यात त्यावेळेचे प्रसिद्ध वाचनालय ( अजूनही आहे.) चितळे रस्त्यावरील 'अहमदनगर वाचनालय' येथील बालविभागात आमचा मुक्कामच असायचा. सभासदाला तिथे काही मासिकै,कथा,कादंबर्या चकट फु वाचण्याची मुभा असायची. भा.रा. भागवतांचा बन्या ऊर्फ फास्टर फेणे आमचा हिरोच असायचा. त्याचे नविन कोणते पुस्तक आले आम्ही लागलीच झडप मारून वाचुन फस्त करत असु.