विरंगुळा
( स्टार्कची लेकरे )
एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो.
(*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत )
जाणकारांमध्ये विंटरफेलचा सुभेदार, उत्तरदिगरक्षक स्वामी एडार्ड स्टार्कच्या लेकरांसंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की जॉन स्नो हा स्टार्क वंशाशी संबंधित होता. राजसिंहासन-क्रिडा* मुळात वास्तवात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात.
पाऊस आपला आणि (पडद्यावरचा)
पाऊस आपला आणि (पडद्यावरचा) आणि आतला-बाहेरचाही !!!!
=====
त्याचा किंवा तीच्या आर्जवांना "होकार" आलेला असतो अन मन सावरीच्या कापसासारखं हलकं तरंगत असतं वास्तवाची जमीन दिसत नसतेच.
सरिंवर सरी आल्या ग...
कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो.
तेवढ्यात बाहेर झिमझिम पावसाला सुरुवात झाली.
स्टारशिप इंटरप्राईज्_नॅनो (शतशब्दकथा)
स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय
अंतराळ … अंतिम अथांग मिती……… आणि ती अथांग आहेत, हे माहीत असूनही, स्वयंचलित 'स्टारशिप इंटरप्राईज् नॅनो' धैर्याने निघाली होती, तिच्या अविरत ध्येयाच्या पाठ्लागावर….नवजीवन आणि नवसंस्कृतींच्यां शोधात….अमर्यादित असणा-या मितीचा शोध घेणाच्या, एकदलीय साहसी मोहिमेवर.
"ती" - २
"ती" - १
पत्रिका आलीय हे कळल्यावर नैराश्याचा झटका वगैरे येतोय की काय असे वाटले. एका खोलीतून दुसर्या खोलीत जायचे देखील त्राण उरले नाही. जेवणावरची तर इच्छाच उडाली. असे कसे अचानक लग्न ठरलं. विचार करुन करुन डोकं फुटायची पाळी आली. असेही मी कोण होतो जे तीच्या घरचे लोक माझी परवानगी घेणार होते कींवा मला कळवणार होते. मी होतोच कोण. एक तथाकथीत सुशीक्षित बेरोजगार. काम ना धंदा. आणि असला तरी ते मला का विचारतील. मी तर गेली कित्येक वर्षे त्यांच्या कुटूंबीयांना भेटलो नव्हतो. येणे जाणे नाही, फोन नाही. मी उगाच आपला आभासी विश्वात जगत होतो.
बेच दे !…… (शतशब्दकथा )
क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं…
"अरे तुला सकाळी बोललो त्याबद्दल विचार केला का ?….
"ती"
ही कथा संपूर्ण /अति काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.
-----------------------------------------------------------------------
मे महिन्याची सुटटी पडली की मामाचा गाव हे ठरलेलं, तसा माझा स्वतःचा गाव हा मामाच्या गावापेक्षाही हिरवागार आणि शांत. माझ्या स्वतःच्या गावात लोकवस्ती अत्यंत कमी त्यामुळे शांतता जास्त. कदाचित लोकवस्ती अत्यंत कमी असल्यामुळेच हिरवाई जास्त होती. आमचं गाव म्हणजे मोठ्या गावाकडे जाणार्या एसटीचा थांबा. ओहळाच्या कडेकडेने असलेली मोजून बारा घरे. दोन घरांच्या मधे जी काही जागा होती तिथे नारळ आणि पोफळ (सुपारी).
मार्केट(यार्ड)... एक संवादी मुक्तक! भाग-१
ढिश्श्....क्लेमर! :- ज्यांना लेखन वाचताना शिव्यांचा व तथाकथित अश्लिलाचा त्रास होतो,त्यांनी खरच येथून खाली वाचू नये..आणि तरिही वाचलेत व वाचून वाइट वग्रे वाटू लागले..तर ते मनातल्या मनातच-वाटून घ्यावे! ;) तसेच कथा/संवाद हे वास्तववादी आणि पात्र काल्पनिक आहेत. हे जम्ले त्र लक्षात ठिव्ने!
टाइमः- हमालांची ..मार्केटयार्ड मधली कामं संपल्यानंतरची एक दुपार..
राम्या:- ए गन्या........गां*&^% बडिशोप कशाला आन्ली बे परत?
गन्या:- मां...ग्??? सारकि सारकि जिरा कशाला? आजारी पडल्यागत वाटतं पिताना
राम्या:- आरं पन आय&^%$ हीनी दुपारचं आंग लै काटा मारत ना बे.......!
गन्या:- मंग त्येला काय जालं?
चुक लक्षात येणे..... (शतशब्दकथा)
"क्रुरसिंहराजा, माझ्याकडून झालेल्या गेल्या दहा वर्षांची सेवा स्मरुण, कृपया माझा मृत्युदंड दहा दिवसांनंतर अमलात यावा, जी शिकारी कुत्र्यांची टोळी माझी लचकेतोड करणार आहे, त्यांच्या सेवेत माझे शेवटचे दिवस जावे" निष्ठारामाने विनवले.
मिसळपाव