"तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघच्या कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. तिला विसरणे खरंच इतके अवघड होते? का? ती जेव्हा आपल्या आयुष्यात नव्हती तेव्हा आपण जगत नव्हतो तिच्या आधी आपल्या आयुष्यात कुणी दुसरी होती असेही नाही. मग ? आपल्याला तिची सवय लागलीये? तिचं सतत समोर राहणं आपल्याला खलायचं, तिचं वागणं , बोलणं , हसणं खिदळणं सर्वच नावडतीचं मीठ अळणी असल्यासारखं वाटायचं , मग आता असं झालय तरी काय आपल्याला, का ती सारखी डोळ्यासमोर दिसते? का तिच्या बांगड्यांचा आवाज कानात घुमतोय.