जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....
भायखळ्याचं जिजामाता उद्यान.
जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल.
हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच.
मिसळपाव