काही रेखाचित्रे
मी लहानपणी आगाशीला (विरारला) रहायचो, आमच्या शाळेजवळ. शाळेत दिवाळीत 'रंगायन' ह्या एका ग्रुपकडुन रांगोळी प्रदर्शन भरवले जायचे. रंगायनची सगळी मंडळी माझ्या आजुबाजुलाच रहाणारी. त्यांच्यात चालणार्या चावट गप्पागोष्टींमुळे आणि वात्रटपणाच्या बालसुलभ आकर्षणामुळे बर्याचवेळा रात्री रात्रभर त्यांच्यात बसायचो. नकळत त्यांची कला बघायची संधी मिळायची.
एके दिवशी काय वाटले काय माहित त्यांच्याप्रमाणे एका चित्रावर ग्रिड काढुन पेन्सिल स्केच बनवले. मग झपाटल्याप्रमाणे 1-2 महिने कहीबाही रेखाटत गेलो.
मिसळपाव
कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.