Skip to main content

विरंगुळा

बाहावा !!

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 13/07/2010 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
.....शेकडो छटांनी खुललेली हिरवाई, ... एक हिरवाकंच बाहावा, आणि पोपटी, झुलता गुलमोहोर... बाहाव्यावर पिवळ्याजर्द फुलांची चादर चढते, अन उन्हाच्या झळांनी सोन्याची झळाळी येते... डोकावणारी शर्मिली हिरवाई, मागे फुललेला लालकेशरी, पिवळ्या ठिपक्यांचा झुबकेदार गुलमोहोर... ------- -- -- आज पाऊस कधीचा कोसळतोय... हिरवा बाहावा ओलाव्यानं जडावलाय... भारावलेल्या फांद्या, आळसावल्यागत सुस्तावल्यात... एखादी झुळूक येते, नकोनकोसं होत त्या इकडेतिकडे करतात, ...आधीच पावसाचा मारा, त्यात तो लंपट वारा... नकोनकोसं होऊन ती फांदी जमिनीकडं झुकते...

अफलातून जाहीराती : फ्रेश एपिसोड (२०१०)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 11/07/2010 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
(१) एक मंत्री खुर्चीवर सर्वानुमते जावून बसतात. पण, अनेक वर्षे झाली तरी खाली येण्याचे नाव घेत नाहीत. इतर इच्छुक मनातून नाराज असतात. जनतेला वाटते- "वा! काय सुखी मंत्रिमंडळ आहे ते!" शेवटी इतर मंत्रीगणांचा रागाचा पारा अनावर होतो. "खाली या हो आता" मंत्री खुर्चीसह हवेत तरंगतात व म्हणतात- " खाली न येतो मी, खाली न येतो, खाली न येतो, खाली न येतो मी" मंत्री मंडळातील एक जण- " जारे! खुपीरिया साबण घेवून ये. यांना आंघोळ घाल मग ताळ्यावर येतील ते" खुपीरिया साबणाने आंघोळल्यावर मंत्री खाली येतात.

द गेम ऑफ द सेंचुरी!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 11/07/2010 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
१७ ऑक्टोबर १९५६. न्यूयॉर्कमधे रोझेनवॉल्ड चेस टूर्नामेंट सुरु होती. १३ वर्षाचा एक बालक त्याच्या दुप्पट वयाच्या इंटरनॅशनल मास्टर आणि अमेरिकन चेस चँपिअन असलेल्या डोनाल्ड बायरनसमोर बसला होता. लोक कुतुहलानं हा सामना बघायला जमले होते. त्यातही हा मुलगा काळी मोहोरी घेऊन खेळत होता त्यामुळे किती चालीत तो मात खातो आहे ह्याचेच आडाखे बहुदा बांधत असावेत पण त्यांना कल्पना नव्हती की त्यादिवशी ते एक इतिहास घडताना बघणार होते!