विरंगुळा
दारू एके दारू... :)
दारुचा पाढा!
दारू एके दारू, बैठक झाली सुरू
दारू दुणे ग्लास, मजा येई खास!
दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन!
दारू चोक बियर, टाका पुढचा गियर!
दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म
दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी
दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की
दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा
दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री
दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला!
:)
एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे.
आपला,
(ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.
नळ आणि सुंदरी
नळावरच्या लायनीत काल जावच लागलं
पुरषासारखा पुरुष असुन ..
त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं
वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी र्हाली
तीचं करुन करुन माय कमरंत वाकली
आज मग बाबुला उदबत्या विकाया धाडलं
आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं
इतक्यात ती समोरुन जणू तरंगत आली...
मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली
तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता
आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता..
सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत...
हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळलं व्हतं...
पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता..
काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला हो
Taxonomy upgrade extras
नार्सिससच्या प्रतिबिंबाची लावणी
मागे आजानुकर्ण यांनी नार्सिससची कथा सांगितली. इथे त्याच्या प्रतिबिंबाने म्हटलेली लावणी देत आहे. ("विडंबन" म्हणण्याइतके यात व्यंग्य नाही, आणि काव्य म्हणण्याइतपत प्रतिभा नाही, आता काय करावे...)
नार्सिसस
नार्सिसस
जवळि असा बसस
तू न जर दिसस
मी पण नाही...
कोणता मम शिणगार?
तू जो करी काही!
त्या दिसा
दिला तू ठिय्या
करुनि मी हिय्या
थिरक भुवयांत
भुवयांत, लाल गालांत
लाल ओठांत
तू कशा
ओळखिला खुणा
सख्या सजणा
लऊ हळुवार
दे मुका मजला
पेटविले अंगार!
मी फार
तुझा रे यार
रंग आकार
तुझाच!
Taxonomy upgrade extras
पुराणातली वांगी
नमस्कार लोकहो !!
काही माणसं आयुष्यात अशी भेटतात की ज्यांना पाहिल्यावर वाटतं ते किती भाविक ? पण दिसतं तस नसतं. काही वेळा लोक अपरिहार्यतेमुळे भक्ती करीत असतात. पण त्यांच्या माथी उगाच शेंदूर लावला जातो. ते बिचारे त्यांचं आयुष्य जगत असतात.
या विषयावरील एक किस्सा.
एका खेड्यात नामसप्ताह आयोजित केला होता. एका विद्वान बुवांना त्यात कीर्तनासाठी बोलावले होते. गावातल्या विठ्ठलमंदिरात दिवसभर भजन, नामस्मरण, पूजाअर्चा आणि रात्री या बुवांचे कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम.
बुवांना विचित्र अनुभव आला. बुवांचं कीर्तन सुरू होतांना, गावातले सगळे लोक उपस्थित असायचे पण हळूहळू एकएक जण कटायला लागायचा.
बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे
कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी "ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा.
१. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता.
'टप्प्याचे' महत्त्व - (पी.जे.-कम -कोडं)
नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यातही त्याची निवड होऊ शकली नाही.
खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले.
बम भोले बम
मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी.
दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो.
गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.
मिसळपाव