Skip to main content

विरंगुळा

नींद नही आती बडी लंबी रात है.

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 31/12/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
मला जाग आली. कुठे आहे मी. आणि हे काय कसला आवाज येतोय. बीप बीप बीप बीप एक सारखा. ठरावीक अंतराने येतोय. कुठे आहे मी. हॉस्पिटलमधे असल्या सारखा वास येतोय. कुठे आहे मी. माझ्या डावीकडे तो आवाज येतोय. ठरावीक अंतराने बहुतेक प्रत्येक एक दोन सेकंदाने तो आवाज येतोय. बीप बीप बीप बीप. डोळ्या समोर काहीच दिसत नाहिय्ये. कुठे आहे मी. फक्त एक पांढरा कसलासा रंग. मी डोळे फाडून बघतोय. बहुतेक खोलीचे छत आहे. तो सिलींग फॅन फिरतोय. पण हा त्याचा आवाज नाहिय्ये. मग कसला आवाज आहे हा. आणि मी कुठे आहे? काहीच कळत नाही. कोणीतरी बोलल्याचा आवाज येतोय. " डॉक्टराना सांगायला हवं. नो .

हुच्चभ्रू एलिट शिरेल्स

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 30/12/2017 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !! बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत. माझी उडी ज्याच्या मध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं अश्या फालतू मराठी शिरेल पासून फार तर हिंदी पर्यंतच किंवा जास्तीतजास्त हुच्च् म्हणजे डब केलेली एखादी ल्युसी. आता आमची अभिरुचीच अशी त्याला काय करणार? आमचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे वाघिणीचे दूध. आम्ही ते भीत भीतच पिलेलो त्यामुळे च्यामारी काय बोलतोय काय बी कळंना अशी अवस्था. हरी पुत्तरचं नाव ऐकलेलं ते सिनेमाच्या संदर्भात.

'फेकू'किस्से

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 27/12/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांना थापा मारायची बालपणापासून सवयच असते. त्यातील काहींची मोठे झाल्यावर ही सवय मोडते तर काहीजण आयुष्यभर फेकुगीरी करत राहतात. समोरचा थापा मारतो हे आपल्याला कळत असतं, परंतू आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीचे वय, पद किंवा परिस्थीती बघून दुर्लक्ष करतो.अडाण्यापासून ते उच्च शिक्षितापर्यंत अशा थापा मारणारे सर्रास आढळतात. गंमत म्हणून मी प्रत्यक्ष ऐकलेले काही फेकू किस्से देतो. किस्सा: १ आमच्या घरी नवीन फ्रिज घेवून माणसं आली त्यांच्या मागे एक पिळदार शरीर असलेला तरुणही आला. तो नेमका बाबांच्या मित्राचा मुलगा होता. बाबांनी त्याला विचारले तू ह्यांच्याबरोबर कसा काय?

... एक क्षण भाळण्याचा.(४)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/12/2017 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : http://www.misalpav.com/node/41704 ती आत आहे. येईलच. सामोसे घेउया तोवर. आता आमच्या गप्पा चहाच्या टेबलवर सुरू झाल्या. अचानक खोलीच्या दारातून एक साधारणतः पन्नाशी पलीकडच्या एक बाई आल्या. बाइंच्या चेहेर्‍यावर काहीसे हरवल्यासारखे भाव. किंवा कोणतेच भाव नाहीत असे म्हणाना. बाईनी आमच्या कडे पाहिले आम्ही नमस्कार केला. त्यानी उलट नमस्कार केला नाही. ही माझी पत्नी सौंदर्या. नाथ साहेबानी ओळख करुन दिली. चला . बसायचंय इथे. का आत जायचंय परत. बाईंच्या चेहेर्‍यावर काहीच प्रतिक्रीया नाही.

.. एक क्षण भाळण्याचा(३).....

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 26/12/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://www.misalpav.com/node/41677 चला तुमचं चहा पाण्याचं बघु या. आलेल्या पाहुण्याला नुसत्या गाण्यागीण्यावर पाठवलं तर त्या रागावतील. तुमच्या वहिनी हो. बसा हं आलोच मी . आम्ही कशाला कशाला म्हणायच्या आतच ते आलोच असे म्हणत आत गेले. सुमीत माझ्या कडेच पहात होता. त्याला बहुतेक हे नवीनच होते. नाथ साहेब हे सुमीतला अगदी सुरवातीला कोणत्यातरी कंपनीत मॅनेजर म्हणून होते. त्यावेळेस सुमीतची त्यांची भेट झाली होती. वाचन ही त्यांची कॉमन आवड. त्यातून ओळख वाढत गेली. चित्रपटाची आवड हेही आणखी एक कारण.

... एक क्षण भाळण्याचा. ( २)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/12/2017 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : http://www.misalpav.com/node/41673 हीच्या आत्तेभावाने, बेल वाजवली. आत कुठेतरी " मै जिंदगी का साथ निभाता चला गया " या गाण्या अगोदरची धून वाजली. आणि ती धून संपायच्या आत एक प्रसन्न चेहेर्याच्या गृहस्थानी दार उघडले. वय बहुतेक साठी पासष्ठ . अंगात टी शर्ट बर्मुडा . " या " हासतमुखाने तोंडभरुन स्वागत केले. ( क्रमशः ). ... सुमीत .... फार दिवसानी येणं केलंत बगा हो. आमचं पुणं सुटल्यापासून तुम्ही अगदी दुर्मीळच झालाय की बघा." बोलण्यातला बेळगावी लहेजा लपत नव्हता. आम्ही आत गेलो.

... एक क्षण भाळण्याचा.

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/12/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यातुन निपजली त्या टाळक्याला सलाम. हल्ली मी चहा घेणे बंद केलय. नाही म्हणजे खूप काही महत्वाचे कारण नाही. पण सध्या घरात चहा पेक्षा घरातले वातावरण अधीक तापते. कारण म्हणाल तर मीच. मला सकाळी मस्त चहा लागतो. आमच्या ऑफिसातला तो कनक शहा म्हणतो. "जेनी चा बगडे एनी सवार बगडे " म्हणजे ज्याचा चहा बिघडला त्याची सकाळ बिघडली. कनक शहा चं माहीत नाही पण माझी मात्र सकाळ बिघडते. अरे एखादा रवीवार येतो मस्त लोळत पडायचे. लोकसत्ता , नवाकाळ, महाराष्ट्र टाईम्स हे वर्तमान बिघडवणारे सर्व प्रकार नजरे आड करायचे.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/12/2017 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.

सलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब

लेखक स्वलिखित यांनी मंगळवार, 05/12/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाम अली साहब... सालगीराह मुबारक हो , तुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये..

मी...एक अ(न)र्थतज्ञ !!

लेखक चिनार यांनी शनिवार, 02/12/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
कालपरवा रिझर्व्ह बँकेचा एक लक्षवेधी अहवाल जाहीर झाला. आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. गेले काही दिवस जरा भविष्याच्या चिंतेतच होतो. या आर्थिक मंदीमध्ये आपली नोकरी टिकेल का? समजा नोकरी गेली तर दुसरी मिळेल का? पगार वगैरे कसा असेल? असे बरेच प्रश्न पडत होते. पण त्यादिवशी आरबीआयच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी माझ्यावर उपकारच केले म्हणायचे. आता मला ओळखणाऱ्या लोकांना वाटेल की, माझ्या टीचभर ज्ञानाचा, चिमूटभर कौशल्याचा, वेळकाढू नोकरीचा आणि तुटपुंज्या उत्पन्नाचा रिझर्व्ह बँकेच्या अहवालाशी काय संबंध? मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची शप्पथ घेऊन सांगतो, त्या अहवालाशी माझा काहीही संबंध नाही.