Skip to main content

इतिहास

खंडाळ्याच्या घाटासाठी...

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 28/11/2022 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

माझे शाळा अनुभव

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 10/11/2022 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझे शाळेचे अनुभव खुप छान होते. शाळेच्या मुख्य मैदानात एखादा कार्यक्रम असायचा. कार्यक्रम असला शाळेत तर भयानक दंगल घडायची. जनरली प्रमुख पाहुणे नंतर कार्यक्रमस्थळी येतात. पण माझ्या शाळेत प्रमुख पाहुणे आधीच स्टेज वर आणून बसवले जायचे. स्टेज समोरच असलेले बाहेर जायला फक्त २ गेट. ते गेट पक्के बंद करून, कूलूप लावून समोर दोन शिपायांचा खडा पहारा ऊभा केला जायचा. त्या नंतर दोन तासाचं भाषण एकवण्यासाठी पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणले जायचे. कुणी पळून जाऊ नये म्हणुन सर/ मॅडम हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन ऊभे असायचे. पण तरी एखादा मोठा लोंढा कार्यक्रम सुरू असताना किंवा सुरूवातीलाच गेट जवळ पळत सुटायचा.

Silver Trumpet and Trumpet Banner

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 07/11/2022 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.

मद्रासकथा-२

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 06/11/2022 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
. भारतातील पहिल्या महिला आमदार . भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 23/10/2022 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
Byculla यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.

तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग .

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 02/10/2022 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
. पेरियार आणी राजाजी. आधी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीपासूनच पेरियारांमध्ये काँग्रेसबद्दल द्वेष नव्हता. ब्राह्मणेतरांचा मुद्दा घेऊन जस्टीस पार्टी सत्तेत असतानाही पेरियार काँग्रेसमध्ये होते, खादीचा प्रचार करत होते. त्यांना काँग्रेसमध्ये आणणारे केशव पिल्लई काँग्रेस सोडून गेले पण पेरियार काँग्रेसमध्येच राहिले.

तमिळनाडूचा इतिहास भाग- ९

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 25/09/2022 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्र:- कुडियारसू . गांधी आणि पेरियार यांच्यात काय फरक होता? शेवटी दोघांनाही तर अस्पृश्यांची मुक्तीच करायची होती. अरुंधती रॉय आणि इतर अनेक लेखकांनी गांधी-आंबेडकर जोडीवर असेच प्रश्न मांडले. पाहीले तर कुठलाही वैज्ञानिक विचार किंवा 'दोन अधिक दोन चार' असे विचार माननार्या माणसाला गांधींमध्ये दोष दिसू शकतो.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/09/2022 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.

तमिळनाडूचा इतिहास भाग-८

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 15/09/2022 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती. गांधी मद्रासला आले तेव्हा पेरियार यांचे नाव ई.व्ही. रामास्वामी नायकर असे होते. ते एका श्रीमंत व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या घरी ब्राह्मण नियमित येत असत. त्यांच्याशी शिवा-अशिवी सारखा प्रकार होत नव्हता. सुरुवातीला त्यांची टीका खोडी काढण्यापासून ते प्रामाणिक कुतूहलापर्यंत होती. खरे तर धर्मावर सकारात्मक टीका ही भारताची प्राचीन परंपरा होती.