०४ नाशिकचे घड्याळजी - नाशिकचा उद्योग
पेशव्यांस घड्याळाचे भलते वेड.
१७३४ साली बाजीराव पेशव्यांनी खरीदलेले घड्याळ १७३५ सालात एका कॅप्टन वॉकर नामक इंग्रजाने दुरुस्त केले असा उल्लेख असलेले कॅप्टनने बाजीरावास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. म्हणजे बाजीराव घड्याळ वापरत होते. गंगापूरला राहणाऱ्या माधवरावच्या आई गोपिकाबाईस ठराविक घडीला जप आणि ध्यान करता यावे म्हणून खास तीन रुपये किमतीचे वाळूचे घड्याळ - वालुकायंत्र - दिले होते. माधवरावाचे धाकटे बंधू नारायणरावकडे चक्क हातघड्याळ होते, ते तो मिरवीत असे. हातघड्याळ इतकी दुर्मिळ चीज होती की नारायणराव बडेजावीने वापरीत.
मिसळपाव
