Skip to main content

इतिहास

< < मजबुरी है > >

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 14/05/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

... काय म्हणतील!

लेखक रातराणी यांनी शनिवार, 14/05/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/05/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व.... भाग - १ पहिला... बालगंधर्व....

झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 05/05/2016 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
झोपडपट्टीतले दिवस: भाग एक मला कळायला लागलं तेव्हाचं आठवतंय. आम्ही एका सुंदर कॉलनीत राहत होतो. मी जवळच्या प्लेगृपमधे जात होतो. ही कॉलनी किती सुधारलेली होती हे लक्षात येईल. कारण ८३-८४ च्या काळातच इथे प्लेगृप ही संकल्पना होती. छान खेळणी वैगरे असायची तिथे. गणवेषही होता. इंग्रजी पोएम्स होत्या. साडेचार वर्षाचा असतांना, गणवेषात १८-२० मुलांसोबत बाई मध्ये खुर्चीवर बसलेल्या अशा फोटोत मी चौथ्या नंबरला मागच्या रांगेत उभा होतो. माझा जीवलग मित्र खाली बसला होता. बरीच वर्षे जपून ठेवला होता तो फोटो. त्या कॉलनीत आमचं भाजीचं दुकान होतं.

फॉल ऑफ जायंट्स - एक अविस्मरणीय वाचानानुभव

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 04/05/2016 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच केन फॉलेट यांचं 'फॉल ऑफ जायंट्स' हे ८५० पानी जाडजूड पुस्तक वाचून संपवलं. त्यांच्या 'सेंच्युरी ट्रायोलॉजी' मधलं हे पहिलं पुस्तक! मी या लेखकाचं किंवा या पुस्तकाचं नाव ऐकलेलं नव्हतं पण थोडी पाने चाळल्यावर उत्सुकता चाळवली आणि शेवटी हे पुस्तक मी वाचायला घेतलं. साडे आठशे पानांचा हा जाडजूड ठोकळा माझ्या रोजच्या ऑफीसच्या पिशवीत ठेवून मी बसमध्ये वाचन सुरु केलं. वेळ मिळाला तर घरीदेखील वाचू लागलो. पहिली ४०-५० पानं वाचल्यानंतर या पुस्तकाचा अतिप्रचंड आवाका लक्षात आला. कुठलंही पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर त्या पुस्तकाची हलकी नशा चढावी लागते.

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/04/2016 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 30/04/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a

मरण!

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 25/04/2016 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

स्टालिनग्राड भाग - ४ ..शेवटचा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 25/04/2016 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्टालिनग्राड भाग-१ स्टालिन्ग्राड भाग-२ स्टालिनग्राड भाग-३ स्टालिनग्राड भाग - ४.. शेवटचा ........हिटलरने हे विधान मानवतेला अनुसरुन केले का परिस्थितीला अनुसरुन केले हे समजायला मार्ग नाही. स्टॅलिनग्राडमधे असलेल्या मोठ्या हॉविट्झर तोफांबद्दल हिटलर म्हणाला, ‘त्या जर आपण गमावल्या तर तसल्या तोफा आपण तेथे परत पाठवू शकत नाही. त्या जर आपण तेथेच टाकल्या तर या युद्धाचा उद्देशच नष्ट झाला असे म्हणावे लागेल.