हिटलरने खरंच आत्महत्या केली का?
दुसरं महायुद्ध अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं होतं. जर्मनीचा पूर्ण पराभव झाल्याचं स्पष्टं झालं होतं. फॅसिस्ट इटलीने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करलीच होती. इटालियन कम्युनिस्टांनी बेनिटो मुसोलिनी आणि त्याची रखेली क्लारा पेटाक्सी यांना गोळ्या घालून त्यांच्या मृतदेहांची जाहीर विटंबना केल्याची बातमी नुकतीच बर्लिनमध्ये आली होती. ती बातमी येण्यापूर्वीच रशियाची रेड आर्मी बर्लिनमध्ये शिरलेली होती. बर्लिनच्या चौकाचौकांतून जर्मन सैनिकांचा प्रतिकार सुरु होता, परंतु पुढे झेपावणार्या रशियन आर्मीला थोपवण्यात जर्मन सैनिक अयशस्वी ठरत होते.
मिसळपाव
.