आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …
राज्य करणारे करतात निषेध…
पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो …
शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ?
शेवटी मृत्यूच तो ….
नाही का ?
मग आपण सजवतो त्यांची प्रेतं …
गुंडाळतो आपल्या तिरंग्यात ….
आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत
जोडतो आपले हात …
आदरा खातर …
मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो?
आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू …
यातलं काही आठवलं असेल ?
खरं खरं सांगा …
कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ?
ऐका माझं ,आपण असंच करु.…
तिरंग्यात गुंडाळून आणु ….
मिसळपाव
माननीय महोदय,
सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे.