Skip to main content

जीवनमान

रंग कवितेचे -

लेखक विदेश यांनी सोमवार, 23/05/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली माझी कविता हो प्रेयसीने वाचली - अर्धी लिहिली होती तरी अय्या कित्ती छान म्हणाली ! दुसरी माझी कविता हो आईने ती ' पाहिली ' - कौतुकाने सांभाळूनी पेटीतच ती ठेवली ! तिसरी माझी कविता हो बापाने वाच(व)ली - कागद मागे पुढे बघुन कोरी बाजू वर ठेवली ! चौथी माझी कविता हो दुसऱ्याने ती पाहिली - खो खो हसून तिसऱ्याकडून तीनशे मित्रात फिरवली ! पाचवी माझी कविता हो बायकोने वाचली - काही समजली नाही तिला रद्दीतच तिने घातली ! सहावी माझी कविता हो शेजाऱ्याने वाचली - नेहमीप्रमाणे 'जळून ' त्याने तुकडे करून भिरकावली ! सातवी माझी कविता हो टीकाकाराने चाळली - त्यालाही ना कळल्यामुळे 'सर्व
काव्यरस

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/05/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी
किती दिस झालं, आठवंना सालं गोष्ट सांगतो मी खरीखुरी; लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ|| हि असली कसली चढती महागाई वाढत्या भावानं जीव निघून जाई पहिल्या आठवड्यात पगार संपतो बँक खाते अन खिसा रिकामा होतो पैसा जावून मी जणू होतो भिकारी लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१|| ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं महागाईनं आगीत तेल टाकलं पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं गरीबीत दिवस काढणं आलं उसनवारी करावी लागती दारोदारी लई दिसांची

"पांगिरा"

लेखक गणेशा यांनी रविवार, 22/05/2011 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
"पांगिरा" कथा : विश्वास पाटील दिगदर्शन: राजीव पाटील ( जोगवा फेम) --- काय लिहु तेच जास्त कळत नाहि इतका भिषण वास्तववादी आघात झालाय मनावर... ह्या चित्रपटातुन जे चित्रण दाखवले गेले आहे, ते आपल्या अवतीभोवती आपण कायम पहात असतो- ऐकत असतो आणि त्यामुळे शेतकर्यांच्या जीवनाबद्दल तेथील राजकारनाबद्दल विचार करताना मनात कमालीची अस्वस्थता आणते आहे.. सामान्य गावामध्ये वस्तीवरती लोक कसे जीवन जगतायेत.. राजकारणी -सरपंच सरकारी योजनांचा बोजवारा वाजवुन कसा पैसा उकळतो.. गावातील -वस्तीवरील लोकांच्या रोजचे जीवन तर खरेच मन पिळवटुन टाकणारे आहेत.. त्यांचे आभाळाच्या पांघरुनाखाली निजलेले स्वप्न पिक .. त्याची चिंता ..

एका घराची गोष्ट

लेखक पैसा यांनी रविवार, 22/05/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
maajhe ghar ही गोष्ट आहे या चित्रातल्या घराची. अगदी "खेड्यामधले घर कौलारू" म्हणण्यासारखं घर. कौलारू असलं तरी खेड्यातलं नाही. चांगलं रत्नागिरीत आहे. हे घर आहे माझ्या आजोबांचं. खरं तर त्यांच्या वडिलांचं. म्हणजे माझ्या पणजोबांचं. रत्नागिरीत वरची आळी तयार होण्यापूर्वी रहाट आगर नावाचा गाव होता तेव्हा तिथे बापटांची अनेक घरं होती. त्यातलं एक मोठं चौसोपी घर होतं माझ्या पणजोबांचं.

आपण असे कसे?

लेखक समीरसूर यांनी रविवार, 22/05/2011 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार! मी समीर बोलतोय व्यंकटेश रेसिडन्सीमधून. आमच्या बिल्डिंगची लिफ्ट संध्याकाळी सात वाजल्यापासून बंद आहे. ज्येष्ठ मंडळी खाली फिरायला गेली आणि नंतर त्यांना चौथ्या-पाचव्या मजल्यावर जिन्याने जायला लागले. माझा वेगवेगळ्या नंबरवर मिळून हा पाचवा फोन आहे. कुणी येणार आहे का लिफ्ट दुरुस्त करायला?" "अर्ध्या तासात येतो साहेब." "असं आश्वासन तुमच्या कंपनीतल्या अजून कुणीतरी मला दोन तासांपूर्वी देखील दिलं होतं; त्यांचा अर्धा तास किती तासांचा आहे मला माहित नाही." "नाही, नाही...मी येतो नक्की" "ठीक आहे. मी वाट बघतो." अजून एक तासाने मी पुन्हा फोन लावतो. रात्रीचे दहा वाजलेले असतात.

(फळं) खा, पिऊ नका!

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 21/05/2011 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
'माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस.' 'दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला , तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटर चे फ्रेश ज्यूस पिते. ' ' रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड मित्रांसोबत जॉगर्स पार्क ला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!' आहेत न ह्या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. ह्या पैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे.

शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 21/05/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे - शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम : आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.

डाल ग कोंबडी डाल

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 20/05/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
डाल ग कोंबडी डाल
डाल ग कोंबडी डाल, तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||धृ|| चोच बारीक लाल लाल पिसं पळतीया कुठं, पकड निट हाती धरून आण तिला इथं नको करू तिच्या जिवाचे हालं ग डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||१|| तुरेवाल्या कोंबड्याला कोंबडी लई ग प्यारी दानं घाल दोघांना, झाली आपली न्याहारी पानी प्यायाला निर्मळ घाल पारातीत पोरासोरांना खेळू नको देवू तिथं एकांत मिळू दे दोघांना आता कुत्रं मांजर तू लांब हाकलं ग डाल ग