Skip to main content

जीवनमान

कंट्रोल....

लेखक भानस यांनी गुरुवार, 25/02/2010 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
( साधारण सव्वासात-साडेसातच्या दरम्यान मीनल व महेश घरी येत असत. बहुतेक वेगवेगळे क्वचित ठरवून स्टेशनवर भेटलेच तर बरोबर. मीनलचे भाजीपाला-खाऊ, गरजेच्या गोष्टी खरेदीत महेश वैतागत असे त्यामुळे शक्यतो ही सारी कामे मीनल एकटीच करी. आजही नेहमीप्रमाणे भाजी घेऊन मीनल पाळणाघरात गेली. चार वर्षाची मधुरा आईची वाट पाहतच होती. रिक्शातून उतरून मीनलने तिला हात केला तशी मावशींना टाटा करून मधुरा तिची छोटीशी बॅग घेऊन खाली आली व मीनलला मिठी मारून बसली. दिवसभराच्या अनेक गोष्टी आईला सांगायच्या असल्याने मधुराने चिवचिवाट सुरू केला. मायलेकी दहा मिनिटात घरी पोचल्या.

** पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन **

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 24/02/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २८ फेब्रु २०१० स्थळ - शिक्षक भवन नवी पेठ पुणे वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ५ संपर्क - अ‍ॅड बाळासाहेब शिन्दे ९८५००४३२१२

असेही हळदीकुंकू

लेखक रेवती यांनी सोमवार, 22/02/2010 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील व्यक्तींची नावे काल्पनिक आहेत. साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) "अगं हो, मला वाटलंच होतं तू फोन करणार म्हणून, पण पाच घरी हळदीकुंकू म्हणजे वेळ लागला परत येतायेता!" सौ. सासूबाई संक्रांतीच्या हळदीकुंकवांबद्दल सांगत होत्या. कुलकर्ण्यांकडे प्लास्टिकच्या टोपल्या तर देशपांड्यांकडे बांगड्या लुटल्या.......कान्हेरे आज्जींकडे डाळतांदळाची खिचडी........असं बोलणं झालं. अश्या प्रकारांमध्ये मला फारच इंटरेस्ट होता. कोणाकडे नविन सुना आल्यात? त्यांच्याकडच्या पहिल्या हळदीकुंकवाला कायकाय झालं? कोणी काय डिश ठेवली होती हेही विचारून झालं.

किस्से कॅफेतले

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 20/02/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये 'बिकांना' माझ्या कॅफेत घडलेले काही गंमतीशीर किस्से सांगितले होते. ते किस्से लिहुन काढ म्हणुन बिका मागे लागले होते पण मी नेहमीप्रमाणेच आळस केला. काल सुहासनी विषय काढलाच त्यामुळे पुन्हा उत्साह आला आणी काही किस्से लिहुन काढले. चला तर मह लुटुया लुत्फ ... किस्सा १ :- वेळ :- सकाळी ११.२५ साधारण एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते. युवती :- एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ? मी :- एक्स्टर्नल ?? युवती :- हो ! किती पैसे होतील ? मी :- तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 15/02/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… (या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या

कडकलक्ष्मी

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 13/02/2010 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा आधार नसुनही सावरते डोलारा विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी, अंगात खणाची ठिगळांची काचोळी काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती, अन् अंश आणखी एक उपाशी पोटी सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले, ओढीत चालते माय पाय थकलेले पदपथी सावली हेरुन बसली खाली, टेकले देव, पोरांना खाऊ घाली तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला, केसांचा बुचडा मानेवर रुळलेला चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ, अनवाणी पायी छमछमणारे चाळ दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली, लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला, घातले साकडे, कौल लावि देवाला हा
काव्यरस

मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 13/02/2010 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे. शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल.