Skip to main content

जीवनमान

न्यू इअर रेझोल्यूशन (अर्थात तेरड्याचा रंग तीन दिवस)!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/01/2009 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
४ जानेवारीला ऑफिसबरोबरच व्यायामाचीही सुट्टी संपली आणि काल संध्याकाळी ५ तारखेला नेहेमीप्रमाणेच व्यायामशाळेत (जिममधे) गेलो. माझ्या स्पिनिंग क्लासमधे वेळेआधी पाच मिनिटे प्रवेश केला. बघतो तर ही गर्दी झालेली. बरेच अनोळखी चेहरे उत्साहात सायकल हापसत होते! २२ सायकलींपैकी २१ भरलेल्या, एकच रिकामी म्हणून स्वतःला लक्की समजत उत्साहाने गेलो तर ती मोडली होती. स्वतःशीच चडफडत एखाद मिनिट उभा होतो. जेफ, आमचा इन्स्ट्रक्टर, त्याची बाईक सोडून आला, मोडकी बाईक तपासून म्हणाला "कॅन्ट फिक्स इट नाऊ, लॉट ऑफ वर्क.

नाताळी बाजार

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 06/01/2009 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली.

मुड

लेखक शितल यांनी सोमवार, 05/01/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मुडी मिपाकर, मस्त पैकी मुड मध्ये येऊन, मी "मुड" बद्दल लिहित आहे. :) तर मुडी मिपाकरहो, या "मुड"चा महिमा अघाध आहे. जेव्हा पासुन आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणिव यायला लागते तेव्हा पासुन हा "मुड" आपल्या मध्ये शिरतो, तो आपला इहलोकी प्रवास संपल्यावरच तो जातो. :) लहान बाळ कधी खुप छान हसुन बोलक्या डोळ्यांतुन आपल्याशी हु, हु करत असते. काही तरी बोलत असते, स्वत:च्या विश्वात हरवुन स्वारी खेळत असते. तर कधी आपण त्याच्या ओळखीचे असलो तरी आपल्याकडे काही न बोलता गप पहात बसते. आपल्या कडे फारसे लक्ष न देता स्वत:च्या विचारात गढुन गेल्या सारखा चेहरा करून बसते.

राजे – १

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 03/01/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायऱ्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र. बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३...!