Skip to main content

जीवनमान

माझी नवी मैत्रेण

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/01/2008 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
गजर झाला आणि झोपमोड झाली. मस्त गुबगुबित बिछान्यात रज‌ईत गुरफटलेला देह बाहेर पडायला राजी नव्हता. पाठोपाठ दूरध्वनी किणकीणू लागला आणि उठणे भाग पडले. दहाचे उड्डाण म्हणजे न‌ऊला हजेरी, म्हणजे साधारण आठला बाहेर पडणे आले. म्हणजे सातला उठलेले बरे. जरा आळसावायचे, एक चहा, जरा टंगळमंगळ, पुन्हा चहा, मग दाढी, तुषारस्नान, मग सामानाचा ताळेबंद एवढे सगळे जमवयला तास तरी हवाच. आठ दिवसाच्या दौर्‍यात पाच गावे पालथी घालायची तर ’विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ अशी स्थिती. रोज नवे गाव, नवे हॉटेल, रोज सामान उघडा आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा बांधा. चालायचेच!

तुम्ही काय कराल....?

लेखक स्वाती राजेश यांनी शनिवार, 19/01/2008 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
पेशवे बाजीराव तिसरे यांच्या "एकांत"कवितेवरून मनात एक विचार आला. खरेच माणसाला या धक्काधक्कीच्या जीवनात एक दिवस दिला आणि त्याला सांगितले तुला काही हवे ते तू कर... हा दिवस तुझा एकट्याचा. तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? तुमची राहिलेली कामे, इच्छा पुर्ण कराल? कि एकांत पणाचा कंटाळा येईल? मला अशावेळी वॉकमन मधून (इतरांना त्रास होऊ नये म्हणून) कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकायला आवडेल.

माझ्याकडेही कार आहे?

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 15/01/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो. त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी जास्त वापर सुरू केला.

आयसीसी चे नवे नियम :

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 09/01/2008 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.

ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर

लेखक धोंडोपंत यांनी गुरुवार, 03/01/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आम्ही विविध विषयांवर आम्ही लेखन करीत आहोत. ज्योतिष हा त्यातील सर्वात महत्वाचा विषय. या विषयाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती समाजात वृद्धिंगत व्हावी आणि त्यायोगे या शास्त्रातील अनेक महत्वाच्या गोष्टींपासून वाचकांचा फायदा व्हावा, ही एकमेव अपेक्षा ठेवून हा लेखनप्रपंच आम्ही करीत आहोत. आज, याच विषयावर, ज्योतिषांकडे जातांना कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याबद्दल सांगतो. साधारणपणे ज्योतिषांकडे माणूस जातो, तेव्हा त्याच्या काही समस्या असतात. जसे डॉक्टरांकडे जाणार्‍या माणसाला काही आजार सतावत असतो, तसेच ज्योतिषांकडे जाणार्‍या माणसाला जीवनाच्या विविध अंगात काही समस्या भेडसावत असतात.

नुतन वर्षाभिनंदन (काही नववर्ष अवतरणे)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 01/01/2008 03:01 या दिवशी प्रकाशित केले.

नवीन वर्षा संबंधी काही अवतरणे वाचनात आली त्यांचे मुक्त भाषांतरः

"तारुण्य म्हणजे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जागणे, आणि प्रौढत्व म्हणजे रात्रभर जागे राहावे लागणे"

"एक हितदर्शी (ऑप्टिमिस्ट) नवीन वर्षाची रात्र पुढील वर्षाचं स्वागत करण्यासाठी जागतो आणि अहितदर्शी (पेसिमिस्ट) जुने वर्ष गेल्याची खात्री करायला"

"अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांना जुन्या सवयी नव्याने चालू करायच्या असतात ना!"

गाण्यांशी निगडीत आठवणी

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 31/12/2007 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील... ख्वाब हो तुम या कोई हकीकत.. किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे.

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 28/12/2007 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?