जीवनमान
ईईईई कॉमर्स - एक अवेअरनेस प्रोग्राम -भाग २
पहिला भाग येथे वाचता येईल :
---------------------------
सिनिअरचा सिनिअर : बरं तुम्ही सुट्टीत मुलांना बायकोला घेऊन फिरायला जाता काय ?
मी : नाही, आम्ही सुट्टीत गावी जातो.
सिनिअरचा सिनिअर : बरोबर. काही वर्षांपुर्वी मी देखील हेच करायचो. कारण सुट्टीमधे कुठे फिरायला जायचे म्हणजे कमीत कमी ४०-५० हजार तर पाहिजेतच. ते आपल्याकडे नसतात म्हणून बेसीकली आपण गावी जातो. तुमच्या बायकोला विचारा बर की आपण दुबईला, मलेशियाला फिरायला जायचं का ? पाहिजे तर पुढल्या सुट्टीत गावी जाऊ. आय बेट, ती एका पायावर तयार होईल.
संकट आपल्यामागे की आपण संकटाच्या पुढे...
काल सकाळी- सकाळी मोर्निंग वॉकला गेलो होतो गाडीवरून. अहो म्हणजे, गाडीवरून बागेत गेलो आणि तिथे मोर्निंग वॉक/योग केले.
तिथून घरी परत येत असताना एका गल्लीमध्ये गाडी नेली. तेव्हा तेथील एक कुत्रे जे खरे तर माझ्या वाटेवर नव्हते ते उगाच पळायला लागले. त्याची एवढी घाबरगुंडी उडाली की पळता-पळता ते बरोबर गाडीच्या समोर आले आणि आणखीन घाबरून जोरात पळू लागले.
वास्तविक पाहता मुळात कुत्र्याने माझी गाडी आली म्हणून पळण्याची गरज नव्हती कारण ते तसेही वाटेत येत नव्हते.
दरवाजा हो तो ऐसा हो!
साने गुरुजींच्या "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" च्या धर्तीवर "मिपाला पोस्ट अर्पावे" या हेतूने पोटावरती हि एक पोस्ट. डोन्टवरी! यात कुठलेही डायट सल्ले नाहीत, व्रत-वैकल्ले नाही, उपास-तापास नाहीत कि लोखंड उचलायचे प्रकार नाहीत. आहे ते एका "पोटिव्हेशन" बद्दल आयमीन "मोटिव्हेशन" बद्दल.
"पोट" हे श्रीमंतीचे लक्षण असतं हे आजोबांचं वाक्य तर चिकन-मटण खाल्यानंतर कमीत कमी दोन तास झोपलं नाही तर माणूस "नरकात" जातो हे बाबांचं वाक्य.
प्रिय आजीस.....
अयान हिर्सी अलि.
प्रिय आजीस,
तू गेलीस पण मी आक्रोश केला नाही. तशी तू जाणारच होतीस. आई म्हणत होती तू मरतेसमयी ‘‘घेऊन जा ! घेऊन जा !’’ म्हणून आपल्या पूर्वजांचा धावा करीत होतीस. तुझ्या पायांनी तुला सावरण्यास नकार दिला होता कारण तुझे सांधे पूर्ण आखडले होते. जेव्हा ते सरळ असत तेव्हा ते वाकत नव्हते आणि एकदा वाकले की सरळ होत नसत.
प्रिय आजीस,
तू गेलीस पण मी आक्रोश केला नाही. तशी तू जाणारच होतीस. आई म्हणत होती तू मरतेसमयी ‘‘घेऊन जा ! घेऊन जा !’’ म्हणून आपल्या पूर्वजांचा धावा करीत होतीस. तुझ्या पायांनी तुला सावरण्यास नकार दिला होता कारण तुझे सांधे पूर्ण आखडले होते. जेव्हा ते सरळ असत तेव्हा ते वाकत नव्हते आणि एकदा वाकले की सरळ होत नसत.
मिसळपाव