कला
सिंगापुरात वर्षभर ऋतु एकच- उन्हाळा, पण ऋतुगंध किती विविध!
वर्षभरातल्या विविध ऋतुंचा आनंद सिंगापुरात राहून लुटता येत नाही. वर्षभर एकच ऋतु! उष्ण आणि दमट. अशा वातावरणात राहून ऋतुगंध कल्पनेतच शोधावा लागणार. पण हे काही कठीण नाही! मराठी मातीशी जोडलेल्या कल्पना, लेखन, नाट्य, संगीत आदी कलांची उणीव मराठी प्रेमींना जगाच्या पाठीवर कुठेही भासत नाही.
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)ने ईथल्या मराठी बांधवांना साहित्याशी जवळीक साधायला, मराठीशी आपले नाते घट्ट करायला, ऋतुगंध हे द्वैमासिक काढून एक चांगला अवसर दिला आहे. गेली चार वर्षे हे मासिक नियमित प्रसिद्ध केल्या जाते. ह्यात विविध विषयांवरील लेख, कथा, कविता, प्रवासवर्णने, माहितीपर ईत्यादी लिखाण असते.
लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार
या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात.जलतरंग
आत्ताच साम मराठीवर "गुरुकुल" कार्यक्रमात एका वादकाला जलतरंग वाजवताना ऐकलं. फार मजा आली. सहसा कधी ऐकायला न मिळणार्या वाद्या बाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक मराठमोळं नाव समोर आलं.
मिलिंद तुळणकर
अधिक माहिती आणि तुळणकरांचे जलतरंग वादन या दुव्यावर
http://www.artists-india.com/resume/milind_tulankar.php
ट्वायलाईट : एक अजब प्रेमकहाणी
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.
येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.दिले नादान तुझे हुआ क्या है.......
दिले नादान तुझे हुआ क्या है....
ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल.
आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ.
सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.
एका सुरेल व्यक्तिमत्वाचा अस्त ...
मै हूं जयपूरकी बंजारन्...चंचल मेरा नाम ....
स्व. रफीसाहेबांच्या अनेक गाण्यांपैकी एक सुरेल गीत. १९४७ साली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी आलेल्या "साजन" मधील हे गीत. सी. रामचंद्र उर्फ आण्णांचे कर्णमधुर संगीत , कमर जलालाबादींचे शब्द आणि या गाण्यात रफीसाहेबांबरोबर गाणारी गायिका होती ललिता देऊळकर! याच चित्रपटातील अजुन एक गाजलेले गीत म्हणजे....
"संभल संभल के जैय्यो ओ बंजारे....
अनवट
अनवट
भरलेल्या डोळ्यांसमोर सार अस्प्सष्ट ....पण तरीही श्रवण इंद्रिये तशीच तल्लख!! बाजूला तसे कधीही विशेष भावना प्रधान न होणारे माझे धनी ...हाताच्या ओंजळीत हनुवटी ठेवून स्तब्ध ..डोळ्यात भारलेले भाव. थोड स्पष्ट दिसाव म्हणून मी डोळे मिटते आणि माझ्या गालावर अश्रू ओघळले.
माधुरी'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
१५ मे! आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षित-नेने' ला HAPPY BIRTHDAY!
बम बम.......
स्पॉयलर अॅलर्टः ज्यांना बम बम भोले नावाचे प्रकरण पाहायचे आहे त्यांनी ही पोस्ट वाचू नये.
लालबाग परळ पाहायला गेले होते. मध्यांतरात बम बम भोले चा ट्रेलर दाखवला.. प्रेरणा सांगायची गरज नव्हतीच.. दाखवलेल्या त्या एक दोन दृश्यातच मूळ चित्रपटातले शेम टू शेम संवाद नि फ्रेम टू फ्रेम चित्रिकरण पाहून डोकं फिरलंच... आज परीक्षा नि त्यानंतरचं सगळं सबमिशनचं मेन मिशन संपल्यावर टीपी करायचा मूड आला.. नि म्हटलं, चला.... जाऊन त्या बमबम भोलेच्या नावाने शंख करून येऊ.
लालबाग परळ पाहायला गेले होते. मध्यांतरात बम बम भोले चा ट्रेलर दाखवला.. प्रेरणा सांगायची गरज नव्हतीच.. दाखवलेल्या त्या एक दोन दृश्यातच मूळ चित्रपटातले शेम टू शेम संवाद नि फ्रेम टू फ्रेम चित्रिकरण पाहून डोकं फिरलंच... आज परीक्षा नि त्यानंतरचं सगळं सबमिशनचं मेन मिशन संपल्यावर टीपी करायचा मूड आला.. नि म्हटलं, चला.... जाऊन त्या बमबम भोलेच्या नावाने शंख करून येऊ.
मिसळपाव