Skip to main content

कला

अवघा रंग एक झाला....

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 28/10/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील उभा-आडव्या-सरळ-तिरप्या अश्या कुठल्याही अक्षरात बसत नाही असे नम्रपणे नोंदवू इच्छितो..! :) 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..' रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..! रघुनंदन पणशीकर.. 'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द!

भाजे लेणी

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 23/10/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी भाजे येथे जाण झाल. भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत. अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत. ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे) भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे. जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत. स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत. जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो.

उत्सव - वाटेवरील रंग

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 22/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो. वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली.

अगर तूम मिल जाओ...

लेखक फटू यांनी सोमवार, 20/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
सहज तू नळी वर भटकत असताना "जहर" चित्रपटातील "अगर तुम मिल जाओ" या गाण्याचं पाकीस्तानी रुप पाहायला आणि ऐकायला मिळालं. हे गाणं त्यांच्या १९७४ साली आलेल्या त्यांच्या "इमानदार" या चित्रपटात होतं... गाण्याची मुळ गायिका तस्सवर खानुम... आवाज एकदम भारदस्त... श्रेया घोशालच्या गोड आवाजाहून पुर्णपणे वेगळा...

दु:खद निधन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शुक्रवार, 17/10/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ स॑गीत-स॑योजक व अव्वल दर्जाचे हार्मोनियमवादक 'श्यामराव का॑बळे' या॑चे आज दुपारी पाच वाजता डो॑बिवली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते त्र्याऐ॑शी वर्षा॑चे होते. प्रसिद्धीपासून सतत दूर राहील्यामुळे आपल्यातल्या कितीतरी जणा॑ना श्यामराव माहीत नसतील पण त्या॑नी वाजविलेल्या हार्मोनियमच्या तुकड्या॑नी वेड लावले नाही असा स॑गीत-रसिक विरळाच. वानगीदाखलः 'बाई मी विकत घेतला श्याम' (जगाच्या पाठीवर- सुधीर फडके) ह्या गाण्यातली बेफाट हार्मोनियम!

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपुर्ण श्रध्दांजली

लेखक मिंटी यांनी शुक्रवार, 10/10/2008 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना श्रध्दांजली........ जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे (वय ८३) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीन वाजता निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या मागे मुलगा कॅप्टन सनत कुमार, सुन शमा असा परिवार आहे. दुपारी दीड वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहिणीताईंनी नेत्रदान केले होते. पंडिता रोहिणी यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली.

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

लेखक घाटावरचे भट यांनी गुरुवार, 02/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या... तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्‍याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे. आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत. या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा.

मम सुखाची ठेव...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/09/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
मम सुखाची ठेव....
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....! षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा, अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार.. तो तर तिच्या गळ्यातच आहे...! नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...! कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी, स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध, परंतु दोघेही तिचेच