तो (भाग १)
तो (भाग १)
कधी सावरणार ही त्या धक्यातून कोण जाणे? जागा बदलली तर किमान जुन्या आठवणींपासून तिची सुटका होईल अस वाटल होत मला. पण इथे सुद्धा तो शेजारच्या जोशी काकूंच्या व्हरांड्याला झोपाळा बघितल्या पासून ही अजूनच गप्प झाली आहे. बर, हिला कितीवेळा सांगितल त्या बाजूच्या खिडकीकडे फिरकूसुद्धा नकोस. तर मी असताना नाही जात. पण मी नसलो की त्याच खिडकीत जाऊन बसलेली असते बहुतेक. काल जोशी काका भेटले होते ते म्हणाले,'संध्या खिडकीत दिसली म्हणून हिने हाक मारली; पण तिने उत्तर नाही दिल.' मी म्हंटल, 'तिच लक्ष नसेल हो काका.' तर म्हणाले, 'अरे लक्ष होत. आमच्या व्हरांड्यातल्या झोपाळ्याकडेच बघत होती ती बहुतेक.
मिसळपाव