कथा
रामू
खरे तर रामकृष्ण हे त्याचे खरे नाव. पण आम्हा पोरांमधे तो रामू किंवा राम्या नावानेच फेमस होता. म्हणजे तो अजुनही आहे पण आता मी तिथे नाहिये.
रामू माझ्यापेक्षा नक्की किती वर्षांनी मोठा आहे हे मला नीटसं ठाऊक नाहिये पण साधारण आमच्यामधे ७-१० वर्षांचे अंतर असावे. मात्र बारीक अंगयष्टीमुळे रामुचे वय अजुनही कळून येत नाही.
रामू ला राजकारणाची आवड आहे की खाज आहे हे मला नीटसं अजुन उमगलं नाहिये पण कदाचित दोन्ही असावं असं मला अजुनही वाटतं.
रामूचं घर चाळीच्या पुढच्या बाजुला तर माझं मागच्या बाजुला.
कथुकल्या २
१. आवाहन…
दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.
“काय आहे हे?”
“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”
“काहीपण काय फेकतेस गं.”
“अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते.
दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.
“काय आहे हे?”
“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”
“काहीपण काय फेकतेस गं.”
“अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते.देव्हारा...२
देव्हारा...२
"म्हणजे! हुशार, सुंदर, बोलकी. पण तू एकटीच! त्या आदेश आणि अभिजितला नको हं!" तो बजावत म्हणाला.
"का?" तिने आश्चर्याने विचारले.
"हे बघ, आमचा ग्रुप खुप शिस्तप्रिय आणि अभ्यासू आहे." तो फुशारकी मारत उत्तरला. त्याच्यापासून पिच्छा सोडवावा म्हणून तनूने वह्या आवरल्या आणि ती लायब्ररीबाहेर आली. संदिप पण तिच्या पाठोपाठ बाहेर आला. ती काही बोलली नाही याचा अर्थ त्याने होकारार्थी घेतला.>>>>
"आता तूच बघ ना, आदेश ठिक आहे. पण तो आहे त्या अभिजितचा जानी दोस्त! आणि अभिजित म्हणजे... श्रीमंत बापाचा लाडावलेला कार्टा! काहीतरी ताळतंत्र आहे का त्याला?
डाव - ३ [खो कथा]
डाव - १ [ खो-कथा-दुसरी]
डाव - २ [खो कथा]
डाव - ३ [खो कथा]
-----------------------------------
सखाराम:
रात्री झोपेत अचानक माझ्या डोसक्यात ईचारचक्र सुरु झालं, आता समद स्पष्ट झालया, विकी रुपाच्या मागे, उस्ताद रुपाच्या मागे... आयला हा प्रेमाचा खो खो लई डेंजर. मागं असेच एक दोघाचे मुडदे पडले व्हते बाजुच्या गावात, असल्या प्रेमप्रकरणापाई. मला नगं बाबा हे लफडं..वस्ताद १० वी नापास, मारामारीे त्याच्या घरात रोजच हाय. त्याचा बाप आताच जेलमधून सुटुन आलाय.
तुझ्यात जीव रंगला
कथा आणि व्यथा
***************
कुणात जीव रंगला ?
*****
परवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो.
सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती.
आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं .
लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ...
दवाखान्यात जसे सुपरस्पॅशालिटी डाॅक्टर असतात अगदी तसंच इथं ही होतं . सारं सारं स्पशेलचं. दुकानात पोहचल्या नंतर माझं काम संपलं होतं.
मोगरा फुलला !!!
ज्या रस्त्यावरून आपण गेली कित्येक वर्ष सायकल किंवा बसने जायचो, त्याच रस्त्यावरून आज चारचाकी गाडीतून जाताना स्वातीला एकदम भारी वाटत होतं. तोच रस्ता, तिच झाडं, अन तिच घरं ,पण आज सगळं कसं छान वाटत होतं. त्यात शिरीषची आठवण होतीच साथ द्यायला. शिरीषच्या आठवणीने अंगभर मोहरत होती आणि स्वतःशीच हसत होती. हळदीने पिवळ्या झालेल्या हातावरच्या मेहंदीमध्ये त्याचच नाव शोधत होती. सकाळी माहेरी यायला निघाली तेव्हाची त्याची साखरमिठी अजून ताजीच तर होती. ती इथे आणि मन तिथे, अशी तिची अवस्था झाली होती.
गाडी गावच्या वेशीतून आत शिरली आणि आधीच ठरल्याप्रमाणे ड्राईवरने गाडी शाळेच्या गेटवर थांबवली.
डाव - २ [खो कथा]
डाव १
--------------------------------------------
डाव - २
मास्तर :
“तुमची झेडपी पैका गियका पुरवत नाय का?” सरपंच जगन पाटलानं तक्याला रेलत विचारलं. जोरकस वजन पडल्यानं तो हवा भरलेल्या उशीवानी पिचकला.
“सहा महीने झाले अहवाल पाठवलाय पण आजून मदत मिळाली न्हाय. सरकारी कामं कशी असतात तुम्हाला तर माहीतच आहे.”
“चांगलंच माहिते.”
“शाळेची दयनीय अवस्था झालीये. चार वर्गांमधले टीनं फुटले, उन पाऊस डायरेक्ट झिरपतो, बसायला पट्ट्य्या नाहीत, ऑफिसचा दरवाजा तुटलाय.
कॅरॉट
मॉलमधील टॉप फ्लोअरला तो बसला आहे
ती बसली आहे
संगीत आहे
ब्लॅकफॉरेस्ट आहे
एसीची चिलिंग शांतता आहे
त्याच्या हातात एक पेन आहे
मंद हसत तो म्हणाला.
"हाऊ अबाउट अ सेल्फी, डाईंग टू टेक इट विथ यू?"
तिच्या ओठांचा आपोआपच चंबू झाला
कोपराला छातीचा ओझरता स्पर्श...
आणि
क्लिक!
---
डिलक्स अपार्टमेंट. फिफ्थ फ्लोअर. टू बीएचके.
हळूहळू लिफ्ट वर येत आहे. आतमध्ये खुर्ची टाकून बसलेला पोरगा पेपरमध्ये काहिबाही वाचत आहे. त्याला बहुतेक तिची चाहूल नसावी.
"झाला का इंटरव्ह्यू?"
"यप"
"लागली का नोकरी?"
हाऊ डिसगस्टींग. नोकरी फोकरी काही नाही.
इट्स ए जॉब मॅन. इट्स ए जॉब!
----
झंडू फार्मासिटीकल्स. न्यू जॉईनिंग. वेलकम.
असावीस पास ....
असावीस पास , जसा स्वप्न भास जिवॆ कासावीस झाल्याविना .
संदीप खरेंच्या अनेक डोक्याला त्रास देणाऱ्या कवितांपैकी हि एक .आणि किती काही वाटलं तरी प्लेलिस्ट मधून जात नाही हि . रात्री हे गाणं ऐकत पडलो होतो . सुंदर गाणं . तशीच झोप लागली होती
सकाळी ५.३० वाजता फोन वाजला . unknown number . इतक्या पहाटे कोण हा XXXX म्हणत फोन उचलून जवळपास ओरडलो. "वेळ काळ काही आहे कि नाही. ९ नंतर फोन कर. माणसं झोपेत असतात या वेळी .. "
समोरून आवाज आला . थोडा घाबरलेला. तरी हि खुदखुदत " ए बाबा , तुझी चिडचिड कधी कमी होणारे रे. किती तापटपणा तो . बीपी वाढून फुटशील एक दिवस .
मिसळपाव