Skip to main content

कथा

बंदूक भाग १.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 03/03/2023 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पावसाळा संपून जिकडे तिकडे आनंदाचे वारे वाहू लागले.शेतकऱ्याची तर नुसती धांदल उडाली होती. कुणाची भात कापणी सुरु होती.कुणी नाचणीची कणसं वेचत होतं, तर कुणी कापून आणलेल्या धान्याच्या अडव्या घालत होतं. गुरं पोट टम्म भरेपर्यंत चरत होती. नुकत्याच कापून झालेल्या शेतात; कणसातून पडलेले दाणे टिपण्यात पाखरं मग्न होती. त्याची तर मजाच-मजा. धान्य टिपणारी पाखरं बघणं तर त्याहून मजेदार.म्हणजे ती दाणे टिपताना दोन-तीन दाणे टिपणार, मान वर करून आजूबाजूला टकामका बघणार,परत दोन-तीन दाणे टिपणार परत मान वर करून टकामका बघणार. काही धोका नसे पर्यंत हे न थकता सुरूच राहणार.

स्टीमपंक चॅटरबॉक्स

लेखक भागो यांनी बुधवार, 01/03/2023 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्टीमपंक चॅटरबॉक्स डॉक्टर ननवरे बंगल्याच्या बागेत काहीतरी अचाट प्रयोग करत होते. त्यांनी जुन्या बाजारातून बरच काही लोखंडी सामान विकत आणले होते. त्यात काय नव्हते? त्यांत निरनिराळ्या गेजचे लोखंडी पत्रे होते, एम-५ पासून एम-३० पर्यंतचे बोल्ट होते, ओपन एंड, रिंग, सॉकेट, बॉक्स,आणि शेवटी अॅड्जस्टीबल असे स्पॅनरचे अनेक प्रकार. स्टील वायर्स. चेन्स, कप्प्या. बेअरीन्ग्स, पिस्टन आणि मॅचिंग सिलींडर, क्रॅंकशाफ्ट, क्रॅंकेस. आता मी कशाकशाची नावे लिहू डॉक्टरांनी मला ह्या सगळ्या स्टोरचा इन्चार्ज केलं. आणि हुद्दा दिला: भांडारगृह प्रमुख!

आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

लेखक भागो यांनी सोमवार, 20/02/2023 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
तर सांगायचा मुद्दा हा की असे आमचे डॉक्टर “अमानवीय” आहेत. थोड्याच दिवसानंतर सगळ्या पुण्याची मति गुंग करणारी अभूतपूर्व घटना घडली. त्या अघटित घटनेचा मी एकमेव साक्षीदार आहे. म्हणजे डॉक्टरांच्या शिवाय बरका. एके दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरांचा फोन आला, “प्रभुदेसाई, संध्याकाळी इकडेच चहा प्यायला ये. तुला गंमत दाखवायची आहे. माझा कॉर्नफ्लेक्स बनवण्याचा प्रयोग शेवटी यशस्वी होणार अस दिसतेय. तू ये आणि स्वतःच बघ.” म्हणजे डॉक्टरांना कोणीतरी साक्षीदार पाहिजे होता. मला बळीचा बकरा बनवायचे ठरवले होते एकूण. ठीक आहे. आपल्याला काय फरक पडतो?

आले,आले. पॉप कॉर्न परत आले! भाग -१

लेखक भागो यांनी सोमवार, 20/02/2023 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी जेव्हा कॉलनीत रहायला आलो तेव्हा कॉलनीला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. कॉलनीत बहुतांशी हौसिंग सोसायट्या होत्या. मध्येच एखाद दुसरे बंगले होते. बहुतेक सोसायट्याची पुनर्बांधणी होऊन पाच सहा वर्षे झाली होती. त्यामुळे कॉलनी चकाचक दिसत होती. गावांत असा गैरसमज होता की ह्या कॉलनीत फक्त उच्चभ्रू लोकं रहातात. मी आधी गावांत रहात होतो. रिटायर झाल्यावर फंड, ग्रॅच्युइटी इत्यादींची थोडी रक्कम हातांत आली होती. ती पकडून मी कॉलनीत एक सेकंडहॅंड फ्लॅट विकत घेतला. फ्लॅट तसा लहान आटोपशीर होता. माझे अनेक वर्षांचे कॉलनीत राहायचे स्वप्न होते ते आयुष्याच्या शेवटी का होईना पण अश्या रीतीने साकार झाले.

महाशिवरात्री विशेष : पुजा - ले, अरुणा ढेरे (कथावाचन / ऑडियो)

लेखक चौथा कोनाडा यांनी शनिवार, 18/02/2023 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
महाशिवरात्री निमित्त सादर करत आहे कथा अभिवाचन : पुजा ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या शब्दसौंदर्याने नटलेली, श्री बृहदेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवरची आगळी वेगळी प्रेम कथा.

गाठीचे लाकूड

लेखक देवू यांनी गुरुवार, 16/02/2023 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
ए ! " तांब्यात पाणी घेऊन ये जरा, ह्या गाठीने नाकात दम आणलाय माझ्या. ह्या कुऱ्हाडीची धार बोथट करून टाकली तिने ". अहो! निदान आज तरी लाकडं फोडू नका, अजयचा मॅट्रिकचा रिझल्ट आहे. शाळेत गेला आहे तो, येईल थोड्या वेळात मित्रांबरोबर घरी, तेव्हा दारात असा पसारा बरोबर दिसणार नाही. तुझा लेक काय दिवे लावणार आहे माहीत आहे मला. आणि उद्या बंबात काय घालू? तुझ्या लेकाची लाकडं? अहो असं अभद्र तरी बोलू नका आपल्या लेकराबद्दल. अजय लहानपणापासून खोडकर. अभ्यासात फार गती नव्हती. शाळेतून आला की मित्र गोळा करून खेळायला जात असे. त्याचे मित्रही त्याच्यासारखे उनाड आणि खोडकर, रोज काहीतरी उपदव्याप केल्याशिवाय घरी येत नसे.

आठवणी रेंगाळतात.

लेखक भागो यांनी मंगळवार, 14/02/2023 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
“काय झाल? विकला गेलास की नाही?” “नाही रे. वेल्डिंगचा कोर्स केला. सर्टिफाइड वेल्डर झालो. काय उपयोग? काल एकजण बघून गेला. ट्रायल पण घेतली. म्हणाला किंमत जास्त आहे. अजून थोडे पैसे टाकले तर लेटेस्ट मॉडेलचे दोन येतील,” “हो रे, सगळीकडे मंदी आहे. शेअर मार्केट मात्र जोरात आहे. आमच्या इकडे ह्याच वार्ता आहेत.” “मला भीति वाटतीय”. “भीति? ती कशापायी? सकाळ संध्याकाळ दोन टाइमाला चार्जिंग खाऊन मजेत रहायचं.” “मी ऐकलं आहे कि दोन महिन्यात विकलो गेलो नाही तर स्क्रॅप करतील.” “कोण म्हणालं?’ “तोच तो माझ्याबरोबर शो-केसमध्ये उभा असतो तो. तो रे शाहरुखसारखा दिसतो तो. म्हणतो कि फिल्लम मध्ये काम करणार आहे म्हणून.

हरवले ते गवसले.

लेखक भागो यांनी शुक्रवार, 10/02/2023 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. इतकं पाणी कि महापूर. त्या पाणलोटात पूल वाहून गेला होता. किती वर्षं झाली असतील? तिनं कधी पूल ओलांडला नव्हता. पूल ओलांडायची गरज नव्हती. तिची जिवाभावाची मैत्रीण! ती कायम तिच्याबरोबर असायची. शाळेत कॉलेजात. मनसोक्त गप्पा. लोक म्हणायचे, “हिला वेड लागलेय. स्वतःशी बडबडत असते.” गप्पांचा विषय एकच. कविता. क़्वचित कथा. तिनच तिला ती डायरी वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. “आता लिही कविता. या डायरीत. अगदी मनसोक्त लिही. तुझ्यामधील लेखकरुपी पक्ष्याला, घेऊ दे साहित्यगगनामध्ये भरारी.

मानव आणि रोबोट

लेखक भागो यांनी गुरुवार, 09/02/2023 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा पाचहजार वर्षांपूर्वी मीच लिहिलेल्या ‘रोबोट: कथा आणि व्यथा’ ह्या कथा संग्रहातून घेतली आहे. हा कथासंग्रह पाचव्या मितीत( Fifth Dimension) असल्यामुळे वाचकांना तो डाउनलोड करणे शक्य नाही. मीच इथे लिहित जाईन. रोबोही आता पाचव्या मितीत निघून गेले आहेत. तर मानव हे रोबोटपासून उत्क्रांत झाले ह्या रोबोर्वीन नावाच्या शास्त्रज्ञाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मानवाचे प्रोग्रामिंग त्याच्या जन्मापासूनसुरु होते. आधी नातेवाइक, मग शाळा, नंतर समाज हे महत्कार्य करत असतात. खर तर लहान मुले ही आइन्स्टाइन पेक्षा महान शास्त्रज्ञ, शेक्सपिअरपेक्षा महान लेखक असतात. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार असतो.

ती व तो 2023

लेखक भागो यांनी मंगळवार, 07/02/2023 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
तो बहुराष्ट्रीय कंपनीत मनेजर होता तर ती एका राष्ट्रीय कंपनीत संगणकाशी छेडछाड करणारी होती. त्याचे लठ्ठ पॅकेज होते. फ्लॅट होता. लांबलचक गाडी होती. हुशार शोफर होता. अजून काय पाहिजे? तर सांगायचा मुद्दा असा की उणीव होती फक्त एक श्रीमती की कलावती की सेवा करे जो पति की ज़रुरत है ज़रुरत है ज़रुरत है. सेवा करे जो पति की? म्हणजे तिला काय तुम्ही नोकरांनी समजता? काय हे प्रतिगामी विचार! पण एकूण पॅकेज भारदस्त असल्यामुळे प्रतिगामी विचार चालवून घ्यायचे. ती!! तिचे “पॅकेज” “उंच, स्लिम आणि सौंदर्यपूर्ण” होते. त्या दोघांची भेट अश्याच कुठल्यातरी सेमिनार प्रसंगी झाली. कुठला सेमिनार? ते महत्वाचे नाही.