रन राहुल रन...!!
..................................................................
सुरुवातीच्या काळातील लिखाण,
थोडेफार सत्यघटनेवर आधारीत.
..................................................................
रन राहुल रन...!!
धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते.
मिसळपाव
