अवंतिका बाईंची समाजसेवा
आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . आपला अवजड देह ( शक्यं तितक्यां) चपळाईने हालवतं त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच . म्हणून त्यांनी निर्मला बाईंना आलं घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायर्या उतरून बागेत आल्या .
मिसळपाव