Skip to main content

कथा

एक कथा

लेखक रामदास यांनी सोमवार, 14/12/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
आता आपण ज्या नदीला तापी म्हणतो ती नदी तेव्हा कधीतरी तपस्विनी म्हणून ओळखली जायची. म्हणजे सांगायचं एव्हढंच की कथा ऐतीहासीक आहे पण या कथेत युध्द नसल्यामुळे इतिहासात या कथेला जागा मिळाले नाही. पण माणसांच्या मनातून विसरली गेली नसल्यामुळे एका मनातून दुसर्‍या मनात झिरपत गेली. मानवी मनाचा इतिहास अशा कुठल्या कुठल्या कथांमध्ये असतो पण आपण मात्र पाठ करतो जन्म मरण आणि युध्दाच्या सनावळ्या. एका प्राचीन पर्वतराजीतून उगम पावणार्‍या या नदीच्या सुपीक खोर्‍यामध्ये छोटी छोटी पण समृध्द नगरं वसली होती. शेती करणारी प्रजा आणि त्यांची काळजी वाहणारे राजे होते. ही गोष्ट आहे अशाच एका राजाच्या राज्याची. राजाचं नाव आता प्र

भक्षक ....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 14/12/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************************** "ए रम्या, कशापायी भाव खातुस? सांग की काय झालं हुतं त्ये? " गोपाळनं रम्याच्या पाठीत एक दणका घातला. तसा सगळ्यांनीच गलका केला. संज्या, नान्या, पाठकाचा औध्या, म्हटलच तर कुलकर्ण्याचा जन्या.... सगळेच रम्याच्या मागे लागले. "सांग ना बे, कशाला भाव खातो फुकटचा?" "आरं... आरं... वाईच, चा तरी पिऊ देशीला का न्हायी?" रम्यानं चहाचा कप संपवला. मिशीला लागलेले चहाचे कण उलट्या मुठीने निपटून काढले. औध्याकडनं तंबाखु मागुन घेतली. चुना लावून व्यवस्थीत चोळली. कचरा काढून टाकत भुकटी ओठांच्या कोपर्‍यात सरकवली.

शिरपूरचा पार

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 09/12/2009 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"च्यामारी ह्या म्हातार्‍याच्या, हातात घावुदे एकदा... नरडंच आवळतू साल्याचं", हणम्या स्टेशनमास्तरच्या केबीन मधुन बाहेर येता येता करवादला. त्याची धुसफूस ऐकुन तिथेच बसलेल्या दोघा-तिघांनी दात विचकले. नान्याच्या पाठीत धपाटा घालुन तो तिथेच एका दगडावर बसला, बाजुला तोंडातील तंबाकुची पींक टाकुन, तो परत चालु झाला. नान्याच्या पाठीच धीरडं झालेले बघुन बघ्यांची चांगलीच करमणुक झाली. हणम्या जाम तापला होता, तापणार नाय तर काय हो? एकतर जवान गडी, चार महिन्यांपलिकडेतर हळद लागली, आठ्वड्याला दोन रोज ह्याची मुंबई ड्युटी, म्हनजे हा आपला चार रोज तिकडंच की!

अजीब दास्ता हैं ये..... शेवट

लेखक भानस यांनी बुधवार, 09/12/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय झालेय समीरला? मनकवडा झाल्यासारखे का करतोय. ममा म्हणते अगदी तसेच करण्याचा मोह होतोय. सांगावे का मनातले. फार तर काय म्हणेल, " वेडी आहेस का दिशा तू. अग अनुजाशी लग्न ठरतेय माझे. किंवा लग्न आणि तुझ्याशी? ना गं, मी तर नेहमीच तुला जवळची मैत्रीण समजत आलोय. पण कदाचित म्हणाला तर... दिशा, तेवढ्यासाठीच तर परत आलोय मी. खरेच असे म्हणेल का समीर? " अग अग दिशा, काय करते आहेस? आत्ता त्या सायकलवाल्याला मारले असतेस तू. लक्ष कुठेय तुझे? " निमा ओरडत होती. मागून रेश्मा व दिल्यानेही हटकले. " अरे बापरे! दिशा सांभाळ गं बाई, उगाच कोणा बिचाऱ्यावर गाडी घालू नकोस बरं का. कसला एवढा गहन विचार करते आहेस?

अजीब दास्ता हैं ये..... मध्य

लेखक भानस यांनी मंगळवार, 08/12/2009 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याच्या नादात..... का ठंडी हवाच्या नादात दिशा स्टेशनवर पोचली, गाडी स्टँडवर चढवून दोन नंबरवर जायचे म्हणून पुलाकडे वळली खरी पण मन काही पुढे जाईना. काळजात हुरहुर, पोटात फुलपाखरे उडत होती. " ए लडकी, आज बहोत नादान बन रही हो. नक्को करू ऐसा..... क्यूं न करू? मेरी जान तुझे तो सब पता हैं, फीर भी...?" स्वतःशीच अविरत चालणारा झगडा पुन्हा जोर धरत होता. तोच कोणीतरी हाक मारतेय असे वाटून दिशा वळली आणि पाहते तो काय समोर संपूर्ण ग्रुप उभा अन मधोमध समीर. माझा आवडता पांढरा शुभ्र चिकनचा झब्बा, नुकतीच अंघोळ केली असावी - त्यामुळे तकाकणारा चेहरा, तेच जीवघेणे स्माईल, डोळ्यात आर्जव......

अजीब दास्ता हैं ये......

लेखक भानस यांनी सोमवार, 07/12/2009 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने जोर धरला होता. पहाटेच उठून माझ्या रूमची खिडकी सवयीने उघडली होती. मस्त ओले थंडगार वारे अन मध्येच पावसाचे तुषार आत झेपावत होते. जरासे कुंद वाटत होते पण मला आवडतो पाऊस. रह रहके समीर समोर दिसत होता. अरे हो, मी - दिशा. जिथे आनंद, चैतन्य भरभरून नांदत असेल तिथेच मी रमते. आयुष्याला ओझे समजून वाहणारे लोक पाहिले की फार त्रास होतो मला. मी त्यांना सरळ नजरेआड करते. ही अशी जमात आहे ना की त्यांना कोणीही कितीही समजावले तरीही ते करंटेच राहणार. तेव्हा छोड दो. हां आता अगदी जवळचे काही असे वागतात ना तेव्हा चांगली हजेरी घेते त्यांची. परवाचीच गोष्ट, रजत दोन दिवस डोक्याला हात लावून बसला होता.

एका बाजेची गोष्ट

लेखक मराठे यांनी सोमवार, 07/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीकडे जायचो तेव्हाचा तिने सांगितलेला एक किस्सा. तिच्याकडे रात्री गाद्या घातल्यानंतर आजी, मामा, आई, मावशी गप्पा मारत बसायचे. खरं तर त्या गप्पा ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. पण हा किस्सा तिने सांगितला आणि त्या रात्री माझी झोपच उडाली. ती मी ऐकलेली पहिली "भयकथा" पण ती "कथा" नव्हती.. तो तिचा अनुभव होता. आजीचं सासर उरणचं. पहिल्या बाळंतपणानंतर ती घरी आलेली होती. तिला झोपायला घरातली एक बाज दिली होती. ती बाज खूप दिवस अडगळीच्या खोलीतच पडलेली होती. रात्री कधीतरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला बघायला म्हणून ती उठली. पाहते तर बाळाच्या जवळ एक जख्ख म्हातारी बाई बसलेली.

उष्टावण.....

लेखक भानस यांनी सोमवार, 30/11/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल हे रोजचेच झाले होते. दुपारचे चार वाजले नाहीत तोच पोटात भूक दंगा करू लागे. डब्यातल्या दोन पोळ्या कधीच्याच जिरून गेलेल्या. खाली कँटिनमध्येही चहा-कॉफी शिवाय काही मिळत नसे. तश्या आठ-दहा बरण्याही असत. चिवडा, चकल्या, पापड्य़ा, बिस्किटं असे उगाच चावायला काहीतरी. पण बरेचदा त्या बरण्यांच्या तळाशी गळलेले तेल त्यांच्या कालावधीची लांबी दाखवत असे. ते पाहिले की सुधाला मळमळायलाच लागे. बरे बाहेर जाऊन काहीतरी खावे तर सेक्शनमध्ये बोंब. अरे कुठे गेल्यात रे? बराच वेळ झाला. काय ऑफिस आहे का टाईमपास? आँ....... दहा मिनिटांच्यावर जर कोण कुठे गेले तर अर्धी सी.एल कापा म्हणजे चट ताळ्यावर येतील सगळे.

बापलेक

लेखक किलबिल यांनी रविवार, 29/11/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं अनघा, मी आलो ग. आणि ही देवाची फुलं ठेवलियेत टेबलावर." अप्पानी फुलं ठेवली आणि ते बाल्कनीत येऊन आरामखुर्चीवर बसले. ही त्यांची नेहमीची आवडती जागा होती. रोज सकाळी फिरुन आल्यावर इथे बसुन ते गरम गरम चहा पित असत.सोबतीला रेडिओ असायचाच. आजही अनघाने आणुन ठेवलेला कप हातात घेत त्यानी विचारले," प्रकाश कुठे दिसत नाही. अजुन झोपला आहे का?" "नाही, पहाटेच्या गाडीने मुंबईला गेले ते..काहितरी काम होतं " - अनघा "हो हो... तसं काल म्हणाला होता तो. लक्षातच नाही माझ्या" - अप्पा काहीच न बोलता अनघा आत निघुन गेली. महिन्याभरापुर्वीच तर लग्न होऊन आली ती या घरात. अजुन रुळली नव्हती.

पाऊलखुणा..

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 20/11/2009 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणेच मावळतीकडे तोंड करून तो समुद्रकिना-यावरुन चालत होता. त्याच्या मनात कसला तरी कल्लोळ चालू असतानाच त्याची नजर खाली वाळूकडे गेली. त्या सोनेरी वाळूत त्याच्याच पावलांच्या बाजूने काही नाजूक पाऊलं उमटली होती...त्याच्यासारखीच पुढे जात असलेली. त्या पावलांचा मागोवा घेत तो एका खडकाजवळ पोहचला. ती तिथेच बसली होती. गालावर एक हात ठेवून बसलेली आणि तिच्या केसांची एक चुकार बट हळूच तिच्या गालांना स्पर्श करत होती. त्या खडकावर बसून जसं काही ती त्या सूर्याशी हितगूज करत होती...तिच्याकडे निरखून पाहताना त्याला जाणवले की तिचे डोळे खूप सुंदर आहेत.