दयाशील असणं ही एक प्रकारची देणगी आहे.
"जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून मी बराच प्रभावित होतो."
कमलाकर धारणकर हा माझा शाळकरी दोस्त.आपल्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.म्हणून लाडावलेला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार आणि शिस्त बाळगून होता.हे गुण त्याच्या अंगात उपजतच आले होते.कधी कधी आम्ही भेटलो की बालपणाच्या आठवणी काढून गप्पा मारतो.आणि आता ह्या वयावर त्यावेळच्या मनावर बिंबवून गेलेल्या आठवणीत ठेवण्यासारख्या घटनांचं चर्वीचरण करून एखाद्या तरी निर्णयाला येतो.कमलाकर मनाने अळकूळा होता.जरा मन दुखलं की रडायचा.
"तू लहानपणी खूपच भावनाप्रधान होतास.तसाच आता आहेस का?
मिसळपाव