मधुचंद्र
कर्र कर्र कच्चक .........
अंगणात कुठल्यातरी गाडीचा ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि शिवानीने स्वयंपाकघराच्या खिडकीतुन बाहेर बघीतले. गेल्या दिड महिन्यात पहिल्यांदाच कुणाचीतरी चाहूल लागली होती. खरेतर सुरुवातीला शिवानीला थोडे जडच गेले होते इथले वास्तव्य. कायम भरपुर माणसात वावरलेल्या शिवानीला आणि सुहृदलाही इथला एकटेपणा थोडा त्रासदायकच वाटला होता. अर्थात सुहृदला शाळेसाठी नागपुरात अशोकच्या आई-बाबांकडेच ठेवायचे ठरले होते. पण सद्ध्या त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्याने तो आपल्या आई बाबांबरोबरच राहात होता.
मिसळपाव