दादा :- या या या , या ताई...
ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ?
दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ?
ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी.
दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते.
ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते.