लघुकथा: खड्डा
"पिळकर, ते कंत्राट भरा लवकर. त्याच्या मंजूरीचं काय ते मी पाहून घेईन! सरकारी माणसं आपल्या खिशातआहेत!", कीटवानी आत्मविश्वासाने म्हणाले.
पिळकरांना माहिती होते की कंत्राट भरणं ही औपचारिकता आहे. अनेकांचा खिसा गरम करून कीटवानी साहेब ते कंत्राट खिशात घालणार आणि आपल्यालाही त्यातला काही मलिदा खायला मिळणार!
काही महिन्यांनी कंत्राट कीटवानीलाच मिळालं. शहरातील एका रस्त्याचे बांधकाम आता किटवानी करणार होता. गेल्या वर्षी अशाच एका उड्डाण पुलाचे कंत्राट मिळवून त्याने निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरला होता पण पावसाळ्यात पूल कोसळून अनेक वाहनांचे नुकसान होऊन दहा माणसे ठार झाली होती.
मिसळपाव