Skip to main content

कथा

राजयोग - १०

लेखक रातराणी यांनी बुधवार, 06/06/2018 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
कालीमातेच्या मूर्तीसमोर उभा राहून जयसिंह म्हणाला, "तुला खरंच आपल्याच मुलांचं रक्त हवंय, आई? राजवंशातलं रक्त मिळाल्याशिवाय तुझी तहान भागणार नाही? लहानपणापासून मी तुला आई म्हणत आलो, तुझी सेवा केली. इतर कुणाकडे पाहावं सुद्धा वाटलं नाही. तुझी सेवा हेच माझ्या जीवनाचं उद्देश्य आहे असं समजत आलो. मी एक राजपूत आहे, या धमन्यांमध्ये क्षत्रिय कुळाचं रक्त वाहतंय. माझे आजोबा राजा होते, माझ्या मामांचा वंश अजूनही राज्य करतोय.. राजरक्त हवंय ना तुला, मग घे हे.." जयसिंहने अंगावरची चादर काढून फेकली. कमरेला बांधलेल्या म्यानातून चाकू काढला. वीज चमकावी तसं क्षणार्धात त्यानं चाकू आपल्या हृदयाच्या आरपार नेला. मृत्यूची धारदार जीभ त्याच्या छातीला छिद्र पाडत गेली. जयसिंह मूर्तीसमोर कोसळला. पाषाणाची मूर्ती तसूभरही हलली नाही.

राजयोग - ९

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 05/06/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिरात कोलाहल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आषाढ चतुर्दशी होती. आजच रात्री मंदिरात चौदा देवतांची पूजा संपन्न होणार होती. सकाळी ताडाच्या झाडांमागून सूर्य उगवला तेव्हा आकाशात कुठेही ढगांचा मागमूस नव्हता. सोनेरी किरणांनी उजळून निघालेल्या मंदिराभोवतीच्या बागेत जयसिंह जाऊन बसला. लहानपणी त्यानं इथं घालवलेले सुखद क्षण त्याच्या मनात रुंजी घालू लागले. याच मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर, इथेच गोमतीच्या घाटावर, या सुंदर बागेच्या थंडगार सावलीत त्यानं जो काही काळ घालवला होता, तो आता त्याला एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे वाटू लागला.

अनवट वाट ३

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 05/06/2018 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
" तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . " " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . " " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत .

राजयोग - ८

लेखक रातराणी यांनी सोमवार, 04/06/2018 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षत्रराय राजाबरोबर घरी परतत होता. आकाशात अजून कुठे कुठे प्रकाश दिसत होता. खालच्या जंगलात मात्र अंधार हळूहळू आपले हातपाय पसरत होता. उंच झाडांच्या फक्त माथ्यावरच उजेड दिसत होता. हळू हळू तेही अंधारात बुडून गेले की सगळं जंगल जणू अंधाराचं पांघरून घेऊन शांत झोपून जाईल. राजा महालाच्या दिशेने न जाता मंदिराच्या दिशेने चालू लागले. संध्याकाळची पूजा-आरती आटोपून, दिवा लावून रघुपती आणि जयसिंह दोघे झोपडीत बसले होते. दोघेही आपआपल्या काळजीत मग्न होते. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दोघांच्याही चेहऱ्यावरचा अंधार फक्त दिसत होता. तिथे पोचल्यावर नक्षत्ररायचा रघुपतीकडे पाहण्याचा धीर झाला नाही.

पूर्वा ( भाग २ ) (सत्यकथेवर आधारित )

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 04/06/2018 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
" अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . " राहुलची आई तिला बोलावत होती . " हो येते ना काय करताय ? " - पूर्वा " अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला. " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . " " अगं तुला कुठं हि काम सांगू . " " अहो असू द्या हो मी करते हे . तुम्ही बघा किती दमलाय आणि किती घाम आलाय तुम्हाला . थोडा वेळ बसा तोपर्यंत होईल माझं . " " बर बाई बसते मी .

दोसतार-११

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 03/06/2018 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42660
सर भारताच्या क्रिकेट टीम मधे असते तर अशा अचूक नेमबाजी मुळे सरानी पॅव्हलीयन मधूनही बरोब्बर चेंडू फेकून बॅट्समनला सहज रनाऊट केलं असतं . ते या शाळेत शिक्षक म्हणून चुकून आले असावेत.
मी तसे टंप्याला म्हणालो देखील " ह्या.... एकदम टिनपाट. गेल्या वर्षी गॅदरिंगच्या मॅचमधे त्या शरद जाधवने सरांची काय झकास विकेट उडवली होते. एकदम फुलटॉस वर . सर मारायला म्हणून पुढे गेले आणि घसरून पडले. बॉल त्यांच्या बॅटला लागून स्टंपावर गेला होता.

पूर्वा ( भाग १ ) ( सत्यकथेवर आधारित )

लेखक अनाहूत यांनी रविवार, 03/06/2018 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत . " ए सरे, अग कुठं चालली आहेस ? अग थांब . " पूर्वाने त्या गाडीवर जाणाऱ्या दोघांना पाहून आवाज दिला . " ए अग ती त्याच्याबरोबर चाललीय, गाडीवर आहे अन तुमि तिला हाक काय मारताय ? " रेखा घाबरूनच म्हणाली . " कोण ? " - पूर्वाने न कळल्यासारखं विचारलं . " ती " रेखा तिच्याकडे बोट दाखवून म्हणाली . " ती कोण ?

बाप

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 02/06/2018 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
" अय हिकडं कूट ? तिकडं रस्त्याकडंच कपडे बग तुला परवडायची नाहीत इथली कपडे . " दरवाननं त्याला हटकलं. " तस नाय दादा . पोरग लय माग लागलं होत म्हणून आलो होतो . आन मी पैशे जमवल्यात त्यासाठी . " त्यानं अजीजीनं सांगितलं . " बर जा आत " त्यानं सगळीकडं पाहिलं खुपच भारीभारी कपडे होते तिथं . कुठला निवडावा आणि कुठला नाही असं झालं होत त्याला त्यातल्यात्यात एक मस्त ड्रेस बघून त्यानं किंमत विचारली किंमत ऐकून तो बुचकळ्यात पडला " दादा मोठ्या माणसाचं नाय लहान लेकरासाठीच कपडे पायजे त्याची किंमत सांगा . " " अरे दादा ही त्याचीच किंमत आहे .

राजयोग - ७

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 31/05/2018 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिथून निघाल्यावर जयसिंह निर्जन रस्त्याने मंदिराकडे परत जाऊ लागला. तसं तिथून मंदिर फार दूर नाही पण आज जयसिंहला परत तिकडे जावंसं वाटत नव्हतं. किनाऱ्यावर एक मोठं झाड पाहून तो त्याखाली बसला. शरीराच्या थकव्यापेक्षा त्याच्या मनाला थकवा आला होता. आज पहिल्यांदाच त्याला अगदी एकटं एकटं वाटत होतं. विचारांचा ताण असह्य व्हायला लागला तेव्हा त्यानं आपला चेहरा हाताच्या ओंजळीने झाकून घेतला. त्याला वाटलं, आजचा एक प्रश्न तर मिटला पण इथून पुढे माझ्या मनातला संशय कोण दूर करणार? चूक काय, बरोबर काय कोण सांगणार?

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ५

लेखक रा.म.पाटील यांनी बुधवार, 30/05/2018 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज ..!! (Decorate Your Love) : कथा - ५ लग्न.. ( प्रेमाची सप्तपदी..) सर्व उपस्थित लोकांच्या नजरा नव्या नवरीवर खिळल्या जेव्हा नवरीने हॉलमध्ये प्रवेश केला आणि त्याची नजर मात्र नवरीमागून येणाऱ्या एका करवलीवर.. हीच का ती त्याच्या आयुष्याच्या पिक्चरची हिरॉईन.. स्पीकरवर गाणे लागले होते.. 'तुम्हे जो मैने देखा, तुम्हे जो मैने जाना, जो होश था, वो तो गया..' त्याला हवे तसेच ते गाणे.. न तिची एन्ट्री..