Skip to main content

मांडणी

पडद्यांचे जग

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 12/02/2021 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
हौसेला मोल नसतं आणि निराशे इतकी स्वस्ताई शोधून सापडायची नाही. दोन्ही मनाचेच खेळ अगदी दोन टोकांवरले. हौसेत जगणं कृतार्थ झाल्याचा भास आणि निराशेत त्याच्या अंताचा. या दोन मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजे जीवन. या रेषेवरचा प्रवास मोठा गमतीदार. पण इथले बरेचसे प्रवासी भरपूर वजन घेऊन या प्रवासाची सुरुवात करतात. आणि त्याचा व्हायचा तोच अपेक्षित परिणाम होतो. रेषेवर कुठेही असला तरी त्या माणसाची जीवनातली दमछाक काही थांबत नाही. हां सांगायचं राहिलं.. ओझं पडद्यांचं. हो पडदे.. अनेकवचनी! एका स्थिर रंगमंचावर एकाच वेळी अनेक प्रयोग सादर करायचे असतील तर काय करावे लागेल?

"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 01/02/2021 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
संत महंतांच्या जीवनावर आधारित काव्यातून किंवा गद्यातून केलेले लेखन पोथी लेखन म्हणून मानले जाते. अद्भूत रम्यता, पारलौकिक अनुभव, चरित्र नायकांचे अचाट किंवा अवास्तव वर्णन त्यांच्या भक्तगणांना मान्य असते. ते श्रद्धा भावनेने पोथी लिखाण वाचतात, पारायणे करतात. त्यांनाही अदभूत अनुभव येतात. ते खाजगीत सांगितले वा बोलले जातात. पण मुद्दाम ते सार्वजनिक करून सांगण्याचे साहस करायच्या भानगडीत पडत नाही... असो. एक पोथी माझ्या वाचनात आली.

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 31/01/2021 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
aa श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर. बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे.

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

‘मी पाहिलेले-अनुभवलेले आखीव माधवनगर’.

1

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

१.गणेशोत्सव... माधवनगरातील कॉटन मिलमधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यात आरती-प्रसाद विसर्जन या भानगडीत न पडता आम्हा सवंगड्यांना त्यावेळचे खास आकर्षण असे ते दर शनिवारी ठेवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे. त्या काळात एकमेकांच्या घरी जाऊन गल्लीतील सगळे जण बसायला पटकुरं घेऊन रात्री आठ वाजल्यापासून घोळक्याने मिलच्या गेटपाशी रेटारेटी सहभागी होत, आत झुंडीने जात.

जमतारा पॅटर्न

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 14/01/2021 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी नुकताच आलेला अनुभव तुम्हाला सावध करण्यासाठी मांडत आहे. घराची आवरा आवरी करताना बर्‍याच वस्तु माळ्यावरुन निघाल्या, त्यातली एक वस्तू मी ओ एल एक्स वर विकायला टाकली होती. सहसा ओ एल एक्स वर जाहिरात टाकली की लोक चॅटवर चौकशी करु लागतात. बहुतेक वेळा स्थानिक लोकच असतात.बहुतेक जण जास्त फोटो वगैरे मागतात किवा किमतीत घासाघीस करतात. मग फोन नंबर मागतात आणि बोलणे होउन वेळ ठरवुन कधीतरी वस्तु घेउन जातात. पेमेंट सहसा कॅश किवा गूगल पे वर होते. आता या केसमध्ये मला लगेच फोन येउ लागले सगळे लोक हिंदी बोलणारे होते. पहिला फोन आला.

स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि आठवणी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 14/12/2020 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग स्मृतींची चाळता पाने -अनगाव स्मृतींची चाळता पाने -अनगाव2 स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती माझ्या आठवणीप्रमाणे १९५५मध्ये एका स्वयंसेवी संस्थेने ठाण्याचा मासुंदा तलाव साफ करण्याचे आवाहन केले

पुस्तक परिचय अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/12/2020 14:35 या दिवशी प्रकाशित केले.

अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -

1 समापन या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो. लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान ९) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो. १. कोणताही पुर्वाग्रह नको. २. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये. ३.