Skip to main content

मांडणी

अन्नदाता सुखी भव (क्रमशः)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 24/12/2017 02:19 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज

मजूर

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 23/12/2017 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

जिसका पी संग बीते सावन

लेखक समयांत यांनी सोमवार, 18/12/2017 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
जिसका पी संग बीते सावन उस बिरहन/दुल्हन की रैन सुहागन - अमीर खुस्रो तो पावसाच्या सरींनी भिजलेल्या अंगणात आला आहे, आणि माझ्या डोळ्यांत एकाएकी पूर लोटला आहे. त्याला पाहून माझी नजर पुरती पाणावली आहे. अंगावर पाऊस झेलत त्याची भिजलेली भारदस्त छाती माझ्या हृदयाच्या ठोक्यानिशी भरून येते आहे, आणि खोल जाते आहे तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकत आहे. तशीच अचानक वीज कडाडली आणि तो परस्परांतला श्वासांचा बंध तुटला. पावसाला तो मुळीच भावला नसावा. त्याचे डोळे माझ्यावर स्थिर होत आहे जणू या भर पावसातही अनामिक तृष्णा लागून राहावी आणि माझ्या डोळ्यांमध्ये त्या तृष्णेची अपरंपार तृप्ती असावी.

तुलना

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 04/12/2017 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा विमानावर शिटला तुच्छतेने, म्हणून विमानाच्या गर्वात कमीपणा येत नाही. त्याचा वेग, त्याचा डौल, त्याचा झपाटा कमी होत नाही. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एका दमात जाण्याची कावळ्याला खाज मिटवता येऊच शकत नाही. त्याच्या साठी समाधानाची गोष्ट म्हणजे तो दुसऱ्याच्या मनाचा ताबेदार नसतो....! समीर...

राजाची नियत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 02/12/2017 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

Being ALONE n not LONELY!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 01/12/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
एक सांगू का? आपण सगळेच एक साचेबंद आयुष्य जगत असतो. आपले आई-वडील हौसेने आपल्याला जन्माला घालतात... लहानपणी शाळा... तरुणपणी कॉलेज... मग एखादी चांगलीशी नोकरी किंवा व्यवसाय.... यथावकाश लग्न. असा सरधोपट मार्ग आपल्यापैकी बहुतांशी सगळेच जगतो. पुढे आपण देखील हौसेचे आई-वडील होतो. साधारण एवढ सगळ होईपर्यंत आपण पस्तिशीत पोहोचलेलो असतो. अर्थात अजून आर्थिक स्थिरता मनासारखी साधलेली नसतेच.... मग थोडं सुखासीन आयुष्य जगण्याच्या इच्छेने म्हणा किंवा नोकरी-व्यवसायातल्या कॉम्पिटीशनला तोंड द्यायचं असत म्हणून म्हणा आपण पळत असतो. अचानक कधीतरी आपल्या लक्षात येत की आपण पंचेचाळीशी गाठली देखील.

आज पडलेलं स्वप्न

लेखक nishapari यांनी मंगळवार, 07/11/2017 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी झोपले असताना पडलेलं स्वप्न .. यात काही माणसंही होती पण ते बहुधा निरर्थक होतं .... सुरुवात अशी झाली की कोणतंतरी नाटक होणार आहे , स्टेज लागलं आहे , माणसं येऊन खुर्च्यांवर बसली आहेत . गर्दी जमली आहे . आणि मी विंगेत नाटकातल्या 2 कलाकार मुलींना नाटकाचे भरजरी कपडे , दागिने , वेणी वगैरे चढविण्यासाठी मदत करत आहे ... त्यातली एक मुलगी माझी मैत्रीण आहे . तिथून पुढचा सिन - मी मागच्या रांगेतल्या एका खुर्चीवर येऊन बसते नाटक पाहण्यासाठी , ही जागा मला त्या दोघींपैकी कुणीतरी मिळवून दिली आहे नाहीतर गर्दीत जागा मिळणं शक्य नव्हतं ..... तिकीट बिकिट प्रकार नसावा ....

डिश टीव्ही व ग्राहक मंच चा अनुभव

लेखक अलबेला सजन यांनी सोमवार, 06/11/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. मी डिश टीव्ही चा गेले ३ वर्ष ग्राहक आहे. इतके दिवस त्यांची सेवा सुरळीत चालू होती. मात्र १८.१०.२०१७ रोजी मला एक विचित्र अनुभव डिश टीव्ही कडून मिळाला त्याबद्दलचे हे अनुभवकथन. दि. १८.१०.२०१७ रोजी मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे झी मराठी वरील कार्यक्रम बघत होतो. ८.१० मिनिटांनी अचानक माझ्या टीव्ही वरील प्रसारण बंद झाले व तेथे “तुमचा balance संपला आहे, रिचार्ज करा” असा मेसेज झळकू लागला. मला काही समजेना कारण माझ्या खात्याला पुढचे ६ महिने पुरेल इतका रिचार्ज मी करून ठेवला होता. मग नेहमी प्रमाणे एकदा टीव्ही व डिश बंद करून चालू करून पहिले पण तोच मेसेज दिसत होता.

चोर कोण?

लेखक नेत्रेश यांनी शनिवार, 28/10/2017 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सा संताप आला होता! चोरी, आणी ती ही माझ्या अंगणात? बघतोच आता. तर मंडळी, आज शुक्रवार, तेव्हा ऑफीसमधुन संध्याकाळी जरा लवकर परतलो. घरी कुणीच नव्हते. मागे पाहीले तर उन्हाने सर्व झाडे कोमेजलेली वाटली. अंगणात गेलो तेव्हा या आठवड्यात माळ्याने टांग दील्याचे दीसले, हा येवढा परसातल्या पानांचा कचरा. ते वाढलेले काम पाहुन जरासा मुड ऑफ झाला. हल्ली असे बर्‍याचदा करायला लागलाय , तरीच त्याला शेजार्‍याने काढले असणार. मनातच त्याला दोन शीव्या घातल्या. या आठवड्यानंतर त्याला काढुन शेजार्‍याकडे येणार्‍या माळयाला ठेवायचा विचार करायला हवा. तर सुकत आलेल्या झाडांना पाणी घालण्याचे काम चालु केले.

फास्टर फेणे च्या निमित्ताने

लेखक ओरायन यांनी बुधवार, 25/10/2017 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपासून टीव्हीवर फाफे च्या प्रमोशनची जहिरात बघत आहे. हे बघतांना मन भुतकाळात जाते. सहावी, सातवीत होतो. तेंव्हा टीव्ही असणारे कुटूंब फार कमी होते. त्यामुळे असेल कदाचित,पण आमचा फावला वेळ मैदानी खेळ व वाचनात जात असे. मला वाचनाची आवड होतीच. त्यात त्यावेळेचे प्रसिद्ध वाचनालय ( अजूनही आहे.) चितळे रस्त्यावरील 'अहमदनगर वाचनालय' येथील बालविभागात आमचा मुक्कामच असायचा. सभासदाला तिथे काही मासिकै,कथा,कादंबर्या चकट फु वाचण्याची मुभा असायची. भा.रा. भागवतांचा बन्या ऊर्फ फास्टर फेणे आमचा हिरोच असायचा. त्याचे नविन कोणते पुस्तक आले आम्ही लागलीच झडप मारून वाचुन फस्त करत असु.