Skip to main content

मांडणी

ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व

लेखक पी महेश००७ यांनी मंगळवार, 19/07/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर... असं हे धडकी भर‍वणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ते तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं! होय, नारळीच!! नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं. एनसीसीतली एक छोटीशी आठवण आहे. एकदा माझी एनसीसीच्या कॅम्पसाठी निवड झाली नाही.

शेवटी बाप हाय म्या-3

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 25/06/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुला बुलट घिवुन द्यायची आपली ऐपत नवती अण एवढंच काय हे बी कबुल हई म्या तुला कधी खेळायची मोटर बी नै घिउ शकलो. पर तु आठीव अतापोस्तवर तुला कदी बी शाळाची वाट सोडुन रानाची वाट धरा लावली नाय. दोन घास कमी खाल्लं पर तोहया पुस्तकाची सोय लावली. तु बारवी झालास तवापासुण त्याट छाती काडुन गावात फिरायचु. आपुण लावलेलं झाड़ आता गार गार सावली देणार म्हणायचु. मस लोकं मनली, तोहं पोरगं कालेज सोडुन गावांत उंडरतय, पाटलाच्या लेकिवर् उडतय. पर आपला भरुसा होता. म्या म्हणायचु, आपलं रघत हाय फुकट जाणार नाय. पर महा शिक्का खोटा निघला. म्या पिरमात आंधळा झालतु.

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 22/06/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!

सिरियस्ली घेऊ नका

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 18/06/2016 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चॉकलेट नको मला" "मग पाच रुपये सुट्टे दया" "नाहीत माझ्याजवळ" "मग ठेवा ती साखर अण निघा" ----------------------------------------------------- डायल 198 डायल 3 डायल 9 "हेलो" "नमस्कार, मी आपली काय सहायता करू शकतो?" "मी पन्नासचा रिचार्ज मारला. त्रेचाळीस रुपये चा बॅलेन्स आल्याचा मॅसेज आला. दुकानाच्या बाहेर आलो की दोनच मिनिटांत त्रेचाळीस रुपये उडाल्याचा मॅसेज आला" "तुमचा इंटरनेट ऑन होता" "दोन मिनिटांत त्रेचाळीस रुपये? माझ्या 2G फोनला तुम्ही 5G सर्विस जोडली होती काय?" "माफ़ करा पण तुमचा इंटरनेट पॅक नसल्यामूळे मेन बॅलेन्स मधुन डिडक्शन झाले.

'आनंद' ह्यातच!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 12/06/2016 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
'आनंद' दुबइत तासाला वगैरे साफसफाई करणारे 'प्रोफेशनल' घरकाम करणारे मिळतात, पैसे पण तसेच, म्हणजे १तासात जितकं होईल तीतकच, पण असेही काही आहेत जे महिन्याला पैसे घेऊन काम करतात, नशीब चांगलं असेल तर विश्वासु वगैरे, बरे काम करणारे मिळतात! पण आम्ही 'नशीब' या शब्दापेक्षा पुढचा प्रकार मिळवलेला. हा मूळचा हैदराबादचा, घरी ३मुलं आणि छोटी शेती, तोड़कंमोडकं हिंदी, कमी बोलणारा, जाम आद्न्याधारी, विश्वासू, आणि बरेच काही, जे काही हल्ली माणुस म्हणून 'मिसिंग'असतं असं सर्व.

'ओ.एस.भौ'

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 12/06/2016 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
"हे बघ तोह्याचनी हूत आसन त् नीट कर नै त् दी सोडून" "तुमिच सांगा आता काय हुकलं बरं भौ मह्याकडून?" "काय हुकलं मंजी? एक घंटा झालाय साधी पाच पानं छापणं होया ना तुह्याकडनं" "आता म्या तरी काय करणार भौ? एक त् माही रॉम है उलशिक अण त्याच्यात तुम्ही देता भाराभर फायली सोडून. मंग म्या माह्याचनि होईन तेवढं करतु अण लैच गळ्याच्यावर गेल्यार देतु हात टेकुन" "जवा तवा नुसतं त्या रॉम चं सांगत बसतु. नीट पानं भाईर काढाय कशाला रॉम लागतिरं तुला? पाच पाच मिंटाला निसती पानं गळ्यात अड़कुन घेतु अण मंग बसतु केकलत" "हे बघा भौ, लै उनं दुनं नगा काढत बसु. ज़रा त्या मावस्याकड़ं ध्यान द्या.

काजवे दिसले...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 11/06/2016 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी डोळे खाजवले, आणि काजवे दिसले! काजवे शेवटी कधी बघितलेले आठवतय का!? एका मागोमाग एक, डाटा फोल्डरच्या बाहेर... ओव्हरफ्लो... अंगावर पडलेला सुरवंट! रस्त्यावरचं सुखलेलं शेण, धो धो पावसानंतर च्या लक्ख सूर्य प्रकाशात... सूरुच्या बनातला कुज्लेला पानांचा सुगंध... वाडीतल्या चिखलात पडलेले जाम, फुटलेल्या कौलातुन आलेले सूर्यकिरण, चालता चालता डोळ्याच्या कोपर्यातुन दिसणारा... कवळ्यानी अर्धवट टोचून खाल्लेला आंबा... गंजलेल्या खिडकीतल्या बार मधली जळमटं, सारवलेलं अंगण त्यात दीवाळीतल्या नागिणिचा काळा ठिपका...

ती शिंकं…

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 09/06/2016 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे १९८९-९० ची गोष्ट. खरे कुटुंबीयांकडे राहायचो मी बोरिवलीत. राहत्या घराजवळून ३ बिल्डींग्सच्या अंतरावर. सकाळी काका अमोल (माझा वर्ग मित्र) त्याचा मोठा भाऊ, खरे काका, सर्वांची घाई आपापल्या कामाला बाहेर पडायची. माझ्या तोंडात ब्रश… बेसिन जवळ उभा, त्यात पोटात जरा आवाज येऊ लागला, ‘हुरडा’ पडण्याची वेळ झाली होती माझ्या लक्षात आले! ओ_ओ असा काही चेहरा झालेला माझा पण आत आधीच अमोल गेलेला…मनात म्हणालो… हम्म अजून ५मिनट तरी तग धरावा लागेलच! आणि तो दुर्दैवी क्षण… ती शिंकं काय पाप केलेले काय माहीत, असली भयानक अवस्था विचारू नका!

ताल व सुसंगती

लेखक वैशाली अर्चिक यांनी बुधवार, 08/06/2016 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटते लहानपणापासून तालाचे आणि आपले नकळत नाते जुळत असते. बाळाला झोपवताना एका विशिष्ठ लयीत वर खाली होणारी मांडी, अंगाई म्हणताना पाठीवर थोपटताना दिलेला ताल ह्या सर्व गोष्टी बाळाला शांत करतात ह्या त्यातील स्पर्शामुळे व लयीमुळे. बरेचदा मी असे ऐकले आहे की बायकोची झोपमोड होते जर का नवऱ्याने घोरण्याची लय बदलली तर ! काय असतो हा ताल किंवा लय? ज्याला इंग्रजीत आपण rhythm म्हणतो. एका विशिष्ठ वेळेने परत परत होणारी गोष्ट म्हणजे ताल. प्रामुख्याने ह्याचा संबंध आपण फक्त संगीताशीच लावतो. पण असे नाहीये. आपल्या आजूबाजूला हा ताल सगळीकडेच सापडतो. आपल्या छातीत होणारी धडधड ही तालबद्ध असणेच हिताचे असते.