अनुशेषाचा मुक्तीसंग्राम
अनुशेषाचा मुक्तीसंग्राम
काही कामानिमित्ताने भोपाळ येथे एका परिषदेसाठी गेले असता आप मराठवाडासे आए हो ना? जहा शेतकरी आत्महत्या करते है असा प्रश्न एकाने विचारला तेव्हा रझाकारांशी झुंजणारा मराठवाडा या ओळखीपेक्षा शेतकरी आत्महत्या करणारा अशी नकोशी ओळख देशपातळीवर मराठवाड्याची झाली असल्याची जाणीव झाली. निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४७ रोजी मराठवाडा मुक्त झाला.

मिसळपाव
सततच्या दुष्काळाने सैरभैर झालेली जनता. सुरु असलेले पैसेवारीच्या आकडेवारीचे खेळ, दुष्काळाचे राजकारण करत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असलेले राजकारणी या पाश्र्वभूमीवर तिशी पस्तीशीत मरण कवटाळणारे तरुण शेतकरी. मराठवाडा कडेलोटावर येऊन ठेपला आहे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर सारखे सह्रदय अभिनेते दुष्काळाच्या खाईत उतरुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देत आहेत.
दोनच महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळाली. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना मन सुन्न झाले. केवळ नापिकी हे एकमेव कारण शेतकर्यांच्या आत्महत्यांमागे नाही हेही प्रकर्षाने जाणवले.
मोठी धरणे, कालवे आणि प्रक्रिया उद्योगाच्या चर्चा कायम जोरात सुरु असतात. यांच्या होण्याने शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी आशा जागवली जाते. तथापी मराठवाड्यातील शेतीला गरज आहे ती छोट्या छोट्या पायाभूत सुविधांची.