Skip to main content

मौजमजा

फोटो

लेखक भाग्यश्री यांनी शुक्रवार, 06/06/2008 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमीप्रमाणेच सगळ्यांचे फोटो पाहून, मी काढलेले फोटो टाकायची इच्छा झाली.. मागच्या विकेंडला जवळपास फिरताना हे फोटोज काढले.. मी काही उत्तम फोटोग्राफर नाही.. छान नविन तंत्रज्ञानाचा कॅमेरा हातात असून मला त्याचा उपयोग कळत नाही.. ऑटो मोड वर, जे चांगल दिसेल तसे फोटो काढायचा प्रयत्न केलाय.. कसे वाटतायत सांगा.. click on the image to view enlarged version.. घराजवळचा समुद्र ..

इन्फोसिस कँपस

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 30/05/2008 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
मैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे.

त्या गुर्जरनगरी: ओळख

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 24/05/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कुठे अमेरिकायण संपवून मायदेशी परतलो होतो. बर्‍याच दिवसांनी आईच्या हातचं रुचकर जेवण नशिबी येत होतं. त्याशिवाय मित्रांबरोबरचं पूर्ववत फिरणं (खरंतर भटकणं- अगदीच खरं सांगायचं तर उंडारणं), विकेंडला १-२ चित्रपट, हळूहळू येऊ लागलेले आंबे वगैरे गोष्टींचा आनंद मनापासून घेत होतो. अमेरिकेत राहून ज्या स्थळांच - व्यक्तींचं - प्रसंगांचं महत्त्व नव्याने कळलं होतं त्या सार्‍या स्थळांना-व्यक्तींना-क्षणांना नव्याने भेटत होतो. लोकलची गर्दी , धूळ, कचरा या गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग मोठ्या सहजतेने बनू लागल्या होत्या. थोडक्यात सारं काही आलबेल होतं.

साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 18/05/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणा ना! त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा प्रश्न इगोचा असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्‍या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते.

वाघाची मावशी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 15/05/2008 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
बाल कविता वाघाची मावशी वाघाची मावशी, ए मनी मावशी वाघाला आण ना घरी एके दिवशी तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! मग कुठे? लांबलांबच्या तिथे तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात! जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती? छे रे बाळा! आता मी थकले आहे किती? उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत? तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी? म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी शर्थ झाली बाई!
Taxonomy upgrade extras

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 13/05/2008 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो. तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते....