दारू एके दारू... :)
दारुचा पाढा!
दारू एके दारू, बैठक झाली सुरू
दारू दुणे ग्लास, मजा येई खास!
दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन!
दारू चोक बियर, टाका पुढचा गियर!
दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म
दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी
दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की
दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा
दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री
दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला!
:)
एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे.
आपला,
(ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.
मिसळपाव