माझी शाळा: मोठेपणीचा निबंध!
काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही!
कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच!
आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात.
मिसळपाव