Skip to main content

मौजमजा

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 23/04/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळ

क्रीडायुद्धस्य कथा - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 22/04/2015 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी जुनी.... म्हणजे तितकीही जुनी नाही.... पण तरीही आजच्या मानाने जुनीच! पूर्वी - म्हणजे फेसबुक अस्तित्वातही नव्हतं तेव्हा.... आयफोन, आयपॅड सोडाच - आयपॉडही नव्हता. विकिपीडिया, यूट्यूब, ट्विटर... काही काही नव्हतं. माणसं चालताना समोर बघत चालायची. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोनही नसायचा. २४ X ७ न्यूज चॅनल्सचं पेव नव्हतं फुटलेलं... सास बहू सीरियल्सना कोणी सीरियसली घ्यायचं नाही त्यामुळे टीव्ही पण कमीच पाहिला जायचा. इंटरनेटच धड नव्हतं तिथं कसलं ई-कॉमर्स अन कसलं क्लाउड कम्प्यूटिंग! तर सांगायची गोष्ट. आजच्या पेक्षा फारच वेगळा काळ होता.

डोंबिवलीला, फूलपाखरांच्या बागेत, मिपा कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 19/04/2015 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी फूलपाखरू.. निसर्गाचं ‘पंखधारी रत्न’च जणू. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या सुंदर, छोट्याशा जीवांबद्दल माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी अभ्यासाला चालना मिळावी, या हेतूने डोंबिवलीच्या रोटरी क्लबने रविवारी, दि. २६ एप्रिल, २०१५, सकाळी ९ ते १२ या वेळात रोटरी उद्यान, पेंढरकर कॉलेजसमोर, डोंबिवली (पू.) या ठिकाणी ‘डोंबिवली फूलपाखरू महोत्सव’ आयोजित केला आहे.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 10/04/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
. १९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता. ...

एक विचारवंत -शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी गुरुवार, 09/04/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते. अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 08/04/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……! टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी :: १६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता.

गोंधळ

लेखक नाखु यांनी सोमवार, 06/04/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ. असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली. प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो .

गनिमी कावा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/03/2015 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
विचारत इकडे तिकडे आले आज पाहुणे घरात आले अहाहा सदन धन्य झाले .. निवांत खुर्चीवर ते बसले मान डोलवत जरासे हसले रुमालाने तोंडही पुसले .. 'कसे काय तुम्ही वाट चुकला आठव आमचा कसा जाहला ?' - गूळपाणी देत प्रश्न विचारला .. ओशाळवाणे पाहुणे हसले हळूच इकडे तिकडे पाहिले प्रश्नाचे उत्तर देणे टाळले .. पिशवीतून मोबाईल काढला रुमालाने स्वच्छही पुसला माझ्या हाती तो सोपवला .. "गनिमी कावा" त्याचा ध्यानी आला माझ्या त्याच क्षणी मुकाट उठलो हाती धरुनी .. जर्जर जीव त्या पाहुण्याचा "चार्जर" विसरला मोबाईलचा शोधला पत्ता माझ्या घरचा .. ! .

देखा एक ख्वाब तो

लेखक कहर यांनी शनिवार, 21/03/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
"का कुणास ठाऊक पण ऑफिसमधून आज दुपारी ३ लाच बाहेर पडलो. कोणालाच न सांगता . खाली पार्किंग मध्ये पहातो तर काय बाइक गायब. अरे बाप रे ! डायरेक्ट पोलिस स्टेशनला जायला हवे म्हणून निघालो तर गेटवरच बस हजर. अगदी पोलिस स्टेशन च्या पाटीसहीत. याआधी अशा पाटीची बस कधी पाहिली नव्हती . बर बस मध्ये बसलो तर मी सोडून कोणीच नव्हते. अगदी कंडक्टरसुद्धा . बस सुरु झाली आणि भरधाव वेगाने निघाली कि खिडकीबाहेरचे काहीच दिसत नव्हते. ती थांबल्यावर उतरलो नि पहातो तर समोर आफ्रिकेचे जंगल . तसाच जंगलातून चालू लागलो. समोर कॅलेंडरवर दिवसामागून दिवस उलटत होते . शेवटी जंगल संपले नि पुढे सहारा वाळवंट पसरले होते.