Skip to main content

मौजमजा

आठवण

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 09/05/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या "मेरी मा" हे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या "प्रेमा स्वरूप आई" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती.

मुख न लपवून जगा

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 09/05/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती अंधेर्‍या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा हे मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच!

सूर तेच छेडिता- एक संध्याकाळ अमिट(त) "अ‍ॅकॉर्डियन" बरोबर !

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 07/05/2012 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रि वाहिनीवर अमित वैद्य या पुणे स्थित कलाकाराची अ‍ॅकॉर्डियन वादनाची झलक दाखविणारी मुलाखत पाहिल्यानंतर वर्तमानपत्रात अशाच कार्यकमाची जाहिरात ही पहायला मिळाली.व कार्यक्रम विनामुल्य असल्यामुळे चिंचवड ते पुणे असे अंतर काटण्यास मन लगेचच तयार झाले. मोदक पुण्यातून आपले काम आटपून कार्यक्रमाच्या जागी भेटणार होता. मी दुपारी साडेतीनच्या सुमारास निघालो. रविवार असल्याने रस्त्यावर रहदारी बेताचीच. साडेचार चे सुमारास पुण्यात पोहोचून मग डेक्क्नवर इकडे तिकडे भटकत टाईम पास चा कार्यक्रम केला.व नव्यापेठेतील गांजवे चौकात आलो. पत्रकारभवन शेजारी कार्यक्रम होता म्हणून अंदाजानेच एका इमारतीत घुसलो,.

जन्नत २

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 07/05/2012 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे. नेहमीप्रमाणेच हा चित्रपट mechanic ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा.

तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 30/04/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी 'एका तिकिटात दोन बालनाट्ये आणि आइसक्रीम मोफत' अशा जाहिराती आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत.

पुणे कट्टा: १ मे २०१२

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 28/04/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

मुंबई कट्टा - एप्रिल २०१२

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 28/04/2012 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, मुंबईतील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल ९ महिन्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा कट्टा करण्याचे योजले आहे. अमेरिकेतील कोकणवासी (तिथे त्याला क्यालीफोर्निया का कायसे म्हणतात म्हणे) आणि जुने-जाणते मिपाकर नंदन यांचे मुंबईत आगमन झाले आहे. त्याप्रीत्यर्थ सदर कट्टा आयोजित केला आहे. मुंबई कट्ट्यांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरेप्रमाणे (परंपरा ही नेहमी प्रदीर्घ आणि दैदिप्यामानच असते, असे कणेकर गुर्जी म्हणतात), कट्टा श्रीस्थानक अर्थात ठाणे येथे संपन्न होईल.

माझे ब्रह्मज्ञान

लेखक यकु यांनी शनिवार, 28/04/2012 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्‍य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्‍या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्‍ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p ------------------------------------- मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्‍या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे?

तारे जमीं पर.

लेखक गणपा यांनी गुरुवार, 26/04/2012 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
काल फोन वर बोलताना लेकीचा मुड छान होता. शक्यतो तिच्या गप्पा ३-४ वाक्यातच संपतात. पण सध्या मे महिन्याच्या सुट्टीचे डोहाळे चालु झालेत. त्यामुळे स्वारी खुशीत होती. शाळेतल्या गमती जमती सांगायला आतुर झाली होती. परवा म्हणे इंग्रजीच्या तासाला बाई 'अ‍ॅबस्ट्रॅक्ट' आणि 'काँक्रिट' नाउन शिकवत होत्या. तिसरीतल्या मुलांना समजेल अश्या शब्दात समजवण्याची बाईंची कसरत चालु होती. तरी जमेल तितकी व्याख्या सोप्पी करत बाई म्हणाल्या की अ‍ॅबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे ज्या गोष्टीं आपल्याला पहाता येत नाही वा वास घेता येत नाही किंवा स्पर्शही करता येत नाहीत त्या. उदा. ब्युटी, हॅप्पीनेस.