Skip to main content

नाट्य

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

शिर्षकविहीन (शतशब्दकथा) - उत्तरार्ध..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 21/08/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन.. ************************************************************************************** गळ्यातून उसळणार्‍या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्‍या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..." त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच ! अंगावर कोसळणार्‍या नासीरला बाजुला ढकलत ती खुरडायला लागली.

मसाण

लेखक कोमल यांनी बुधवार, 12/08/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
कहानी शुरू होती है एक पोर्न से। देवी. एका कॉम्प्युटर क्लास मधली ट्यूटर. तिच्या एका मित्राकडे, पियुषकडे आकृष्ट होते. लैंगिक संबंधांचे कोडे उलगडण्यासाठी ती पोर्न पाहून पियुषसोबत एका स्वस्तातल्या लॉज मध्ये जाते. तिथे अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीला घाबरून पियुष आत्महत्या करतो. पोलिसांनी या धाडीचा विडिओ बनवलेला असतो. त्यांपैकी एक इन्स्पेक्टर मिश्रा, देवी आणि तिच्या वडीलांपुढे एक मार्ग ठेवतो;
३ लाख रुपये द्या, कोर्ट-कचेरी आम्ही पाहून घेऊ नाहीतर तिचा विडिओ इंटरनेट वर टाकू.

आमची 'कर्म'फळे

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 06/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन.
काव्यरस

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

महाभारतातली माधवी

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 27/07/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्याची लेकरे मधील एका प्रतिक्रियेत श्री स्वॅप्स यांनी माधवीचा उल्लेख केला. महाभारतातील अनुकंपनीय पात्रांमध्ये त्यांनी माधवीचा उल्लेख केला. त्या अनुषंगाने आलेल्या उत्सुक प्रतिक्रियांमुळे ही जिलबी पाडायची इच्छा झाली. त्यामुळे याचा दोष पुर्णपणे स्वॅप्स यांना द्यावा ;).

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/07/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

रिकामी घंटा, लोलक गायब

लेखक तिमा यांनी सोमवार, 13/07/2015 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
वरील शीर्षक माझे नसून एका कल्पक नाटककाराच्या डोक्यातून निघालेले हे घोषवाक्य आहे. नाटकाचे नांव आहे 'शेवग्याच्या शेंगा'. नाटकात विस्तार केलेली मध्यवर्ती कल्पना, 'एकटेपणा', खूपच चांगली आहे. स्वाती टिपणीस, संजय मोने सारखे गुणी कलाकार आहेत. पण.... रविवारी दुपारी आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात स्थानापन्न झालो आणि थोड्याच वेळांत, आमच्या मागे एक ग्रुप येऊन बसला. बसल्या क्षणापासून त्यांचा कलकलाट चालू झाला. त्यांत ते सहा जणांची सेल्फी काढत होते. आम्ही आपले, नाटक सुरु झाल्यावर तरी ही बडबड संपणार की नाही, या विवंचनेत होतो. नाटक सुरु झाले, कादंबरी कदमने स्टेजचा ताबा घेतला.