Skip to main content

नाट्य

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

भिकार शिणेमे आणि त्यांचे निष्टावंत प्रेक्षक

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 07/06/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
@जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं तुमच्यासारखी अनेक तरुण ह्या सिनेमांचे प्रमुख ग्राहक आहेत.( म्हणजे निर्मात्याच्या पैसा वसूल होण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे ) बोर झाल्यावर आजूबाजूच्या जमावाला क दर्जाचे लेहून आपण मिपावर लिहितो बहुदा ह्या एका निकषावर स्वतःला उच्च अ दर्जाचे समजायचे. व मग रावडी राठोड सारखा शिणेमा रीतसर पहायचा. मग आमच्यावर उपकार केल्याच्या थाटात तो शिणेमा किती म्हणजे किती वाईट आहे. ह्याबद्दल समीक्षा करायची. तुम्ही तुमच्या सारखे अनेक जण कार्यालयात पकतात.

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह

लेखक यकु यांनी रविवार, 20/05/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले.

अजिंठा

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 12/05/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला... लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला... बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा
नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा.

कलाईगनर

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 11/05/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.

* शाकुंतल ते कट्यार *

लेखक मदनबाण यांनी रविवार, 22/04/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मला ठाण्यातल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जाण्याचा योग आला. :) पं. चंद्रकांत लिमये निर्मीत शाकुंतल ते कट्यार या नाटकाचा प्रयोग होता. :) मला परवानगी मिळ्याल्याने त्या नाटकाची प्रकाशचित्रे टिपता आली.:) फक्त मिपाकरांसाठी इथे देत आहे. :) आनंद घ्या...

फायनल ड्राफ्ट : एक नितांत सुंदर नाटक.

लेखक तर्री यांनी शनिवार, 21/04/2012 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे नाटक खूप दिवस हातास लागत नव्हते. एका मित्राने “जरूर बघ “ अशी शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी रंगायतनला प्रयोग होता. हल्ली फोन करून तिकीट मिळवता येते. त्यामुळे दूरच्या नाट्यगृहातही “एकाच” खेपेत नाटक पहाणे शक्य होते. नाटक सुरु होण्यापूर्वी तिकीट खिडकीशी प्लान वरून गर्दीचा अंदाज घेण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. “प्लान तर रिकामाच दिसत होता”. अर्थात नाटकाचा दर्जा आणि होणारी गर्दी ह्यांचा काही सम्बंध नसतो . हाच अनुभव चारचौघी ( सुरवातीला) , किरवंत , आत्मकथा , लग्न हया नाटकांना आला होता. फायनल ड्राफ्ट हे एका साध्या कथेवर बेतलेले नाटक आहे .

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

लेखक रमताराम यांनी शुक्रवार, 20/04/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच.