Skip to main content

प्रवास

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

कोल्हापुरि मिसळ

लेखक झकासराव यांनी बुधवार, 14/11/2007 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुरला गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीत. नवीन घेतलेल्या कॅमेर्‍यामुळे डोचक्यात फोटो च भुत भिनलय. आणि मावसभावाने नवीन दुचाकी घेतली आहे. मग काय सगळीकडे घुमत होतो. मग अशीच एक दिवस आठवण आली मिसळीची मग मनात ठरवल की कोल्हापुरातली फेमस मिसळ खाल्लीच नाय. मग दुसर्‍याला सजेस्ट करण म्हणजे काठावर उभ राहुन पोहायला शिकवण्यासारखं. :) मग गेलो उद्यमनगरात "फडतरे" मिसळ खायला. हीच ती कोल्हापुरात फार फेमस असलेली आणि वेगवेगळ्या चॅनेल्सनी पण दखल घेतलेली मिसळ. तिकडे बाहेर १५ मिनिट वाट पहावी लागली एवढी गर्दी होती. अगदी लग्नाच्या पंगतीसारखाच प्रकार होता तो. एक छोटी टपरी असावी आधी.

माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन )

लेखक kolhapuri यांनी बुधवार, 31/10/2007 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन ) - मिश्टर मिनेश भूभू मध्ये एका आद्य वगैरे संकेतस्थळावर एक मनुष्य केनिया वगैरे देशांवर लिहिण्याच्या निमित्ताने गौरवपर आत्मचरित्रच लिहित होते. आमचाही तसाच प्रयत्न. तुला दोन महिन्याच्या कामाला जकार्ताला जायचय अस साहेबाने फर्मावल्यावर मी म्हनलो बर आहे. तसही मी बर्‍याच देशात फिरलो असलो तरी या भागात कधी गेलो नव्हतो. आणि मला फिरण्याची तर खूपच आवड. माझा स्वभावही बोलका, मनमिळावू. पण जकार्ताशी संबंध आला नव्हता कधी. आणि आला तो मित्रांना तिकडचे टॉम याम सूप करून देण्यापुरता.