एक संघ मैदानातला - भाग ७
आमचं हरणं सेलिब्रेट करावं म्हणून आपापल्या पैशाने वडापाव खात खात घरी गेलो. घरी गेल्यावर हात पाय धुवून बेडरूम मध्ये डोकावले तर माझे दूरचे काका आले होते. ते शिक्षक असल्यामुळे त्यांना उठता-बसता कोणाला तरी लेक्चर द्यायला आवडत असावं. सध्या माझ्या धाकट्या भावाची म्हणजे पप्याची शाळा सुरु होती. मी घाईघाईने किचन गाठलं, " ऎ आई हे बडबडं कासव कधी आणि का आलं गं ???"
आजीने पाठीत धपाटा घालत, " मोठ्यांना अस बोलू नये केव्हा कळणार तुला... हे काही तुझं ग्राउंड नाही... " डोस पाजायला सुरुवात केली. आजीनेच सुरुवात केली मग काय आईसाहेब खुश झाल्या, तिनेही सुरुवात केली.
मिसळपाव
.
खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे...