माझी ज्यूरी ड्युटी २
इथून पुढे चालू
आमच्या कोर्टाचा पुकारा होताच आम्ही सगळे हळूहळू कोर्टात हजर झालो. दारात एक कडक चेहर्याची पोलिसाच्या वेषातली कृष्णवर्णीय स्त्री होती. ती शेरीफ असल्याचे कळले. त्या बाईने होतकरू ज्युररांच्या यादीत प्रत्येकाचे नाव पाहून मगच त्यांना बसायची अनुमती दिली. एक म्हातारा ज्यूरर होता त्याने डोक्यावर टोपी घातली होती ती त्याला काढायला लावली. थंडीचे दिवस होते. म्हातारा म्हणाला की त्याला थंडी वाजते आहे म्हणून तो टोपी घालून आला आहे पण कोर्टाचा नियम असल्यामुळे त्याला टोपी काढणे भाग पडले.
मिसळपाव